स्‍वभावदोष आणि अहं यांची निर्मूलन प्रक्रिया करतांना ‘स्‍वतःला चिमटा काढणे’, या शिक्षापद्धतीमुळे साधकांना होणारे लाभ !

‘आपण सर्वांनीच अनुभवले असेल की, चालतांना पायाला ठेच लागली किंवा अन्‍य कुठे लागले, तर आपल्‍या मनाचे लक्ष त्‍या वेदनेकडे त्‍वरित जाते आणि आपले मन ‘त्या वेदना का झाल्या ?’ किंवा ‘का लागले ?’, हे शोधू लागते. अगदी याच प्रकारे गुरुकृपायोगानुसार साधनेच्या अंतर्गत असलेली ‘स्वभावदोष आणि अहं यांची निर्मूलन प्रक्रिया’ राबवतांना साधक स्वतःला शिक्षा म्हणून घेत असलेल्या ‘स्वतःला चिमटा घेणे’ या शिक्षापद्धतीने होते.

श्री. दीप संतोष पाटणे

१. ‘स्‍वतःला चिमटा काढणे’ या शिक्षापद्धतीचा अवलंब करून बुद्धीने मनाला योग्‍य दृष्‍टीकोन दिला, तर अयोग्‍य कृती किंवा विचार यांची जाणीव होणे शक्‍य !

मनात एखादा चुकीचा किंवा अहंयुक्‍त विचार येतो. तेव्‍हा साधक मनाला योग्‍य जाणीव होण्‍यासाठी स्‍वतःला चिमटा काढतो. त्‍या वेळी मनाचे लक्ष अयोग्‍य विचार किंवा कृती यांवरून त्‍वरित त्‍या वेदनेकडे जाते. त्‍या वेळी मन शोधते की, ‘या वेदना मला कशामुळे झाल्‍या ?’ तेव्‍हा आपण ‘अयोग्‍य विचार किंवा कृती यांची शिक्षा म्‍हणून मला या वेदना झाल्‍या आहेत’, अशा प्रकारे मनाला बुद्धीने योग्‍य दृष्‍टीकोन दिला, तर अयोग्‍य कृती किंवा विचार यांची जाणीव होऊ लागते.

२. वारंवार या शिक्षापद्धतीचा अवलंब  केल्‍यास मन सतर्क होऊन मनावरील  अयोग्‍य संस्‍कार न्‍यून होण्‍यास साहाय्‍य होणे

‘स्‍वतःला चिमटा काढणे’ या शिक्षापद्धतीचा अवलंब वारंवार केल्‍यास मन सतर्क होऊ लागते आणि अयोग्‍य विचार करणे टाळते. काही वेळा विचार येण्‍यापूर्वीच मनाला त्‍याची जाणीव होते आणि मनावरील अयोग्‍य संस्‍कार न्‍यून होण्‍यास साहाय्‍य होते.

३. या प्रक्रियेमागे सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा आशीर्वादही कार्यरत आहे. त्यामुळे याचा लाभ अधिक प्रमाणात होतो.’

– श्री. दीप संतोष पाटणे (वय २३ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२६.११.२०२४)