अतिरेकी प्रेम !
एकमेकांवर प्रेम व्यक्त करणे, हे काही चुकीचे नाही; मात्र ते खासगीत करण्याऐवजी सार्वजनिक ठिकाणी त्याचे अशा प्रकारे प्रदर्शन मांडणे, हे चुकीचे आहे. यातून नेमका कोणता संदेश समाजाला जाणार ? ही एक प्रकारची विकृतीच समाजात दिसते.
एकमेकांवर प्रेम व्यक्त करणे, हे काही चुकीचे नाही; मात्र ते खासगीत करण्याऐवजी सार्वजनिक ठिकाणी त्याचे अशा प्रकारे प्रदर्शन मांडणे, हे चुकीचे आहे. यातून नेमका कोणता संदेश समाजाला जाणार ? ही एक प्रकारची विकृतीच समाजात दिसते.
लोकांच्या जिवापेक्षा दुसरे काय महत्त्वाचे असू शकते ?
राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू असूनही मोठ्या प्रमाणात त्याचे उल्लंघन होणे, हे चिंताजनक आहे. पोलीस प्रशासन यावर कायद्याची प्रभावी कार्यवाही कधी करणार ?
महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले की, पुणे शहरासाठी अधिकाधिक लस उपलब्ध होणे आवश्यक आहे. त्यासाठी राज्य आणि केंद्र सरकार दोघांकडेही पाठपुरावा करणार आहे. शहरातील संसर्ग पहाता लसीकरण अधिक वेगाने होण्याची आवश्यकता आहे.
हिराबाई घुले यांची २३ मार्च या दिवशी शहराच्या उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाल्यानंतर उपमहापौरांचा मुलगा चेतन घुले यांनी त्यांच्या ६० ते ७० कार्यकर्त्यांसह महापालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ गर्दी करून घोषणाबाजी केली.
असे लाचखोर वृत्तीचे आधुनिक वैद्य रुग्णावर कसे उपचार करत असतील, याचा विचारच न केलेला बरा !
वाघोलीतील कटकेवाडी येथील सिस्का आस्थापनाच्या गोदामाला २३ मार्चच्या रात्री ८ वाजता आग लागली. हे गोदाम अनुमाने ८ ते १० सहस्र चौरस फुटांचे आहे.
अहमदाबाद जिल्ह्यातील कालुपूर रेल्वे स्थानक येथे वर्ष २००६ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी पुणे पोलिसांच्या साहाय्याने गुजरात आतंकवादविरोधी पथकाने (ए.टी.एस्.) मोहसीन पूनावाला याला वानवडी परिसरातून २३ मार्च या दिवशी अटक केली.
नेहमीच गोवंशियांच्या कत्तलीसाठी वाहन जात आहे, याची माहिती पोलिसांच्या अगोदर गोरक्षकांना कशी काय मिळते ? हा प्रश्न अनुत्तरितच रहातो. पोलिसांनी याविषयी उपाययोजना काढावी, अशी अपेक्षा आहे.
जिल्ह्यातील यात्रा, उत्सव आयोजित करण्यास अनुमती देण्याविषयी निर्णय घेण्यास जिल्हाधिकारी यांना प्राधिकृत केले आहे.