कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पुणे येथे होळी, धूलिवंदन उत्सव सार्वजनिकरित्या साजरा करण्यास प्रतिबंध ! – डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी

डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी

पुणे – राज्यात, तसेच पुणे जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग पुन्हा वाढत असून दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. दक्षतेचे उपाय म्हणून गर्दी टाळण्यासाठी पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण कार्यक्षेत्रात सार्वजनिक ठिकाणी हॉटेल्स, रिसॉर्ट, सार्वजनिक सभागृहे, सार्वजनिक आणि खासगी मोकळ्या जागा, सर्व गृहनिर्माण संस्थांमधील मोकळ्या जागा येथे २८ मार्च या दिवशी साजरा होणारा होळी उत्सव, तसेच २९ मार्च या दिवशी साजरा होणारा धूलिवंदन अन् रंगपंचमी उत्सव साजरे करण्यास प्रतिबंध करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत.

जिल्ह्यातील यात्रा, उत्सव आयोजित करण्यास अनुमती देण्याविषयी निर्णय घेण्यास जिल्हाधिकारी यांना प्राधिकृत केले आहे. प्रतिबंधात्मक आदेशाचे पालन करून नागरिकांनी जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे, तसेच आदेशामधील कोणत्याही तरतुदींचा भंग केल्यास संबंधितांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा-२००५ आणि कायद्यातील इतर तरतुदींनुसार कारवाई करण्यात येणार असल्याचेही म्हटले आहे.