राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू असूनही मोठ्या प्रमाणात त्याचे उल्लंघन होणे, हे चिंताजनक आहे. पोलीस प्रशासन यावर कायद्याची प्रभावी कार्यवाही कधी करणार ?
पुणे – फलटण पशूवधगृहातून २१ मार्च या दिवशी पिकअप गाडीमधून २ टन गोमांस कँप येथे घेऊन येणार असल्याची माहिती गोरक्षकांना मिळाल्यानंतर सरसेनापती हंबीरराव मोहिते गोशाळेचे गोरक्षक शादाब मुलाणी, सचिन शित्रे, निखिल दरेकर, राहुल कदम आणि अन्य गोरक्षक यांनी पिकअप गाडी पोलिसांच्या साहाय्याने येवळेवाडी कोंढवा येथे पकडली. गाडीमध्ये उसाच्या वाड्याच्या खाली १० ते १३ गायी, वासरे आणि बैल यांच्या मांसाचे तुकडे, धड, मुंडके तसेच पाय कातडी काढलेल्या अवस्थेत आढळून आले. कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करून ३ लाख रुपयांची पिकअप गाडी जप्त करून सर्व गोमांसाची विल्हेवाट लावली.
३० सप्टेंबर २०१९ या दिवशी ही पिकअप गाडी गोमांसाची वाहतूक करतांना वडकी हडपसर रोड येथे गोरक्षकांनी पकडली होती.