ज्ञानवापी परिसराचे वैज्ञानिक सर्वेक्षण करण्यास न्यायालयाची अनुमती !

वाराणसी येथील ज्ञानवापीच्या प्रकरणी जिल्हा न्यायालयाने पुरातत्व विभागाला वैज्ञानिक सर्वेक्षण करण्याची अनुमती दिली आहे. येत्या ४ ऑगस्टपर्यंत वैज्ञानिक सर्वेक्षण करून त्याचा अहवाल सादर करण्याचा आदेशही न्यायालयाने दिला आहे.

राजस्थानमधील प्राचीन मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू !

मंदिरांमध्ये भाविकांसाठी वस्त्रसंहिता लागू करणार्‍या मंदिरांच्या व्यवस्थापनाचे  अभिनंदन ! 

जम्मू-काश्मीरमधील प्रसिद्ध कालीमाता मंदिरात वस्रसंहिता लागू : स्कर्ट किंवा जीन्स घालण्यास बंदी !

मंदिरातील पावित्र्य जपल्याने तेथील चैतन्य टिकते आणि त्याचा भाविकांना आध्यात्मिक स्तरावर लाभ होतो. हे लक्षात घेऊन मंदिरात वस्रसंहिता लागू करणार्‍या कालीमाता मंदिराचे व्यवस्थापन अभिनंदनास पात्र आहे !

उदयपूरमधील ऐतिहासिक आणि सर्वांत मोठ्या मंदिरात वस्त्रसंहिता लागू !

देशातील एकेका मंदिराने असे करत बसण्यापेक्षा देशपातळीवरच असा निर्णय सर्व मंदिरांचे विश्‍वस्त आणि मंदिर समिती यांनी घेतला पाहिजे ! यासाठी मंदिरांचा एक देशव्यापी महासंघच स्थापन करण्याची आवश्यकता आहे !

आंध्रप्रदेशात सरकारीकरण झालेल्या मंदिरांची अतिक्रमण करण्यात आलेली भूमी कह्यात घेण्याचा कायदा संमत !

मूळात मंदिरांचे ‘व्यवस्थापन’ चांगले नसल्याचे सांगून सरकारकडून मंदिरे कह्यात घेतली जातात. नंतर मंदिराच्या भूमीही सरकारला सांभाळता येत नाहीत आणि त्यामुळे त्यावर अतिक्रमण होते ! हे सरकारचे कोणते ‘आदर्श व्यवस्थापन’ आहे ? त्यामुळे मंदिरे भक्तांच्याच कह्यात राहू देण्याचा कायदा असला पाहिजे !

गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे डिचोली (गोवा) येथे २५ गोवंशियांना जीवदान

गोरक्षकांच्या लक्षात येते ते सर्व यंत्रणा हाताशी असलेले प्रशासन आणि पोलीस यांच्या का लक्षात येत नाही ?

वायनाड (केरळ) येथील तिरुनेल्ली महाविष्णु मंदिरात चालू असलेले बांधकाम अवैध !

मंदिरांच्या सरकारीकरणाचे दुष्परिणाम जाणा ! केरळमधील सर्वच मंदिरांचे सरकारीकरण झाल्याने आणि याआधीही विविध घटनांत वेगवेगळ्या देवस्वम् बोर्डांतील भ्रष्टाचार उघड झाल्याने या बोर्डांना रहित करण्यासाठीच आता हिंदूंनी आवाज उठवायला हवा !

मथुरेतील राधाराणी मंंदिरात तोकड्या कपड्यांत येणार्‍यांवर बंदी

देशातील प्रत्येक मंदिरात अशी बंदी घालण्यासह हिंदूंना धर्मशिक्षण देण्यासाही प्रारंभ केला पाहिजे !

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह ५० महापुरुषांची जीवनगाथा शिकवणार !

उत्तरप्रदेश शिक्षण मंडळाने राज्याच्या अभ्यासक्रमात पालट केला आहे. आता पाठ्यपुस्काद्वारे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह ५० महापुरुषांची जीवनगाथा शिकवण्यात येणार आहे.

दोन निष्पाप हिंदुत्वनिष्ठांची निर्दोेष मुक्तता झाल्याप्रकरणी आरोपींचे अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांचा अधिवक्त्यांच्या हस्ते सत्कार !  

गुजरात येथील बेस्ट बेकरी प्रकरणातील हिंदुत्वनिष्ठ आरोपींच्या बाजुने खटला लढवून त्यांचे निर्दोषत्व उत्कृष्टपणे सिद्ध केल्याविषयी इचलकरंजी येथील अधिवक्त्यांच्या वतीने हिंदु विधीज्ञ परिषदेचे अध्यक्ष तथा अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.