एका विवाह सोहळ्यामुळे गोव्यात १०० जण कोरोनाबाधित

गोव्यात एका विवाह सोहळ्यामुळे १०० जण कोरोनाबाधित आढळले आहेत. राज्यात कोरोनाची दुसरी लाट येऊ नये, यासाठी नागरिकांनी मार्गदर्शक तत्त्वांचे कठोरतेने पालन करावे, असे आवाहन गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता (डिन) डॉ. शिवानंद बांदेकर यांनी येथे आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदेत केले.

सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाला ‘आदर्श पत्रकार संघ’ पुरस्कार घोषित

आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर याचे स्मारक व्हावे, यासाठी सतत २५ वर्षे पाठपुरावा करून स्मारकाचे स्वप्न प्रत्यक्षात आणणार्‍या सिंधुदुर्ग जिल्हा मराठी पत्रकार संघाला यावर्षीचा मानाचा समजला जाणारा ‘रंगाअण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ’ पुरस्कार घोषित करण्यात आला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यासह महाराष्ट्रात पत्रकारांसाठी आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन

मराठी पत्रकार परिषदेचा ८२ वा वर्धापनदिन ३ डिसेंबरला राज्यात ‘आरोग्य दिन’ म्हणून साजरा करण्यात आला. त्यानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यासह महाराष्ट्रात ‘पत्रकार आरोग्य तपासणी शिबिरां’चे आयोजन करण्यात आले होते.

रेखा जरे हत्या प्रकरणात पत्रकारानेच सुपारी देऊन केली हत्या !

रेखा जरे यांची हत्या ३० नोव्हेंबरच्या रात्री धारदार शस्त्राने गळ्यावर वार करून करण्यात आली. पत्रकार बोठे यांनी जरे यांच्या हत्येची सुपारी दिल्याचे पोलिसांनी सांगितले. आतापर्यंत ५ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

देहली येथे पत्रकार परिषदेच्या वेळी सभागृहाची स्वच्छता करतांना आलेल्या अनुभूती

‘देहली येथील पत्रकार परिषदेपूर्वी सभागृहाची स्वच्छता तेथील एका स्थानिक स्त्री आणि पुरुष कर्मचार्‍यांनी केली होती; परंतु नंतर साधकांनी आवश्यक ती सभागृहाची स्वच्छता आणि शुद्धी केली.

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांचे नागरिकांना हात जोडून अभिवादन करण्याचे आवाहन

हस्तांदोलन केल्यामुळे शारीरिक स्तरावर संसर्ग होतो, तसाच तो आध्यात्मिक स्तरावरही होतो. हात मिळवल्याने रज-तम या सूक्ष्म गुणांचा, तसेच अनिष्ट शक्तींचा संबंधितांना त्रास होण्याची शक्यता बळावते.

आवश्यकता वाटल्यास अमेरिकेतील अन्य ठिकाणचे चिनी दूतावासही बंद केले जाऊ शकतात ! – ट्रम्प यांची चेतावणी

जर आवश्यकता भासली, तर चीनचे अमेरिकेतील अन्य ठिकाणचे दूतावासही बंद करण्यात येऊ शकतात, अशी चेतावणी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली.