(म्हणे) ‘पैगंबर यांचा अवमान करणार्‍यांचा शिरच्छेद केला पाहिजे !’ – आम आदमी पक्षाचे आमदार अमानतुल्ला खान

डासना मंदिराचे महंत यति नरसिंहानंद यांच्या विधानाचे प्रकरण

  • भारतीय कायदे अनेक गोष्टींना अनुमती देत नाहीत; मात्र तरीही धर्मांधांकडून त्यांचे उल्लंघन करून कायदाद्रोही कृत्ये केली जातात. कमलेश तिवारी यांच्याविषयी हेच घडलेले आहे. त्यामुळे पोलिसांनी अशा विधानांकडे गांभीर्याने पहात महंत यति नरसिंहानंद यांना संरक्षण पुरवले पाहिजे !
  • भारतातील कायद्याचे पालन हिंदू करत असल्याने हिंदूंच्या देवतांचा अवमान करणारे हिंदुद्वेषी चित्रकार म.फि. हुसेन यांच्या विरोधात कायद्यानुसार १ सहस्र २५० तक्रारी करण्यात आल्या असतांना पोलिसांनी केवळ ५ ठिकाणीच गुन्हे नोंद केले होते, तरीही हिंदूंनी ते स्वीकारले होते !
महंत यती नरसिंहानंद आणि अमानतुल्ला खान

नवी देहली – देहलीच्या प्रेस क्लबमध्ये आयोजित एका पत्रकार परिषदेमध्ये गाझियाबादच्या डासनामधील मंदिराचे महंत यती नरसिंहानंद यांनी इस्लाम आणि महंमद पैगंबर यांच्याविषयी केलेल्या विधानावरून देहलीतील आम आदमी पक्षाचे आमदार आणि देहली वक्फ बोर्डाचे अध्यक्ष अमानतुल्ला खान यांनी ‘अशी विधाने करणार्‍यांचा शिरच्छेद केला पाहिजे, त्यांची जीभ कापली पाहिजे; मात्र भारतातील कायदे याची आम्हाला अनुमती देत नाही. आम्हाला आमच्या राज्यघटनेवर विश्‍वास आहे आणि मला वाटते की, देहली पोलिसांनी याची नोंद घेतली पाहिजे’, असे चिथावणीखोर वक्तव्य केले. या वेळी एम्.आय.एम्.चे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी देहली पोलिसांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून दिली. या पत्रकार परिषदेमधील विधानांचा व्हिडिओ प्रसारित झाला आहे. त्यावरून खान आणि ओवैसी यांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

डावीकडून महंत यती नरसिंहानंद आणि एम्.आय.एम्.चे खासदार असदुद्दीन ओवैसी

१. ओवैसी यांनी स्वतःचा व्हिडिओ पोस्ट करून म्हटले, पैगंबर यांचा अवमान सहन करता येणार नाही. धर्मगुरूंच्या वेशामध्ये लपलेले हे गुन्हेगार आहेत. मला निश्‍चिती आहे की, तुमच्या धर्मांतही असे काही असणार ज्यावर चर्चा होऊ शकते.

२. ओवैसी यांनी देहली पोलिसांना उद्देशून केलेल्या ट्वीटमध्ये त्यांनी म्हटले की, ही व्यक्ती केवळ मुसलमानांच्या विरोधात हिंसा भडकावण्यासाठी इस्लामचा अवमान करत आहे. तुमचे मौन लज्जास्पद आहे. जर तुम्ही तुमचे कर्तव्य विसरला असाल, तर तुमच्यासाठी एक ‘रिफ्रेश कोर्स’चे आयोजन करू शकतो.