कुंभमेळ्यासाठी केंद्र सरकारकडून ७०० कोटी रुपयांचा निधी प्राप्त ! – तीरथसिंह रावत, मुख्यमंत्री, उत्तराखंड

( प्रतिकात्मक चित्र )

हरिद्वार – कुंभमेळ्यासाठी केंद्र सरकारकडून ७०० कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाल्याची माहिती मुख्यमंत्री तीरथसिंह रावत यांनी ‘ऑनलाईन’ पत्रकार परिषदेमध्ये दिली.

रावत पुढे म्हणाले की, ‘नमामि गंगे’ उपक्रमाच्या अंतर्गत साफसफाईसाठी ५८ कोटी रुपये, शहरातील पूल, भिंती आणि वास्तू यांच्या रंगरंगोटीसाठी १ कोटी रुपये, हरकी पौडी परिसराचा जीर्णोद्धार करण्यासाठी ३४ कोटी रुपये आदी विविध कारणांसाठी ४९ कोटी ६४ लाख रुपये, नवीन पूल उभारणी, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे, नवीन मलनि:सारण वाहिन्या टाकणे, २५ किलोमीटर विद्युत् वाहिन्या भूमिगत करणे, मीडिया सेंटर बनवणे आणि उद्यानांचे सौंदर्यीकरण आदींसह अन्य विकासामांवरही व्यय करण्यात आला आहे.