अनिल देशमुख यांनी धमकी दिल्यामुळे शरद पवार यांनी भूमिका पालटली का ? – सुधीर मुनगंटीवार, भाजप

सुधीर मुनगंटीवार, भाजप

मुंबई – गृहमंत्री अनिल देशमुख यांचे त्यागपत्र घेणे, हा मुख्यमंत्र्यांचा विषय आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार २१ मार्च या दिवशी दुपारी म्हटले होते; मात्र रात्री त्यांनी भूमिका पालटली. ‘देशमुख यांच्या त्यागपत्राची आवश्यकता नाही’, असे त्यांनी सांगितले. अनिल देशमुख यांनी धमकी दिल्यामुळे शरद पवार यांनी भूमिका पालटली का ? अशी शंका भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी २२ मार्च या दिवशी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.

या वेळी सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ‘‘ज्येष्ठ पोलीस अधिकार्‍याने गृहमंत्र्यांवर केलेल्या आरोपांमुळे महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि सन्मान यांचे धिंडवडे निघाले आहेत. राज्याच्या गृहमंत्र्यांनी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना बार आणि पब चालकांकडून वसुली करण्यास सांगितले होते. परमबीर सिंग यांनी त्यांच्या पत्रात केलेल्या आरोपांचे कोणताही पोलीस अधिकारी अथवा बारचालक यांनी खंडण केलेले नाही. या सर्व घटनांचा अहवाल राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांकडून मागवून सत्यता पडताळून तो राष्ट्रपतींकडे पाठवावा. राष्ट्रवादीने गृहमंत्री देशमुख यांना निर्दोष ठरवण्याची घाई करू नये.’’