देवस्थानाचा कारभार पारदर्शक करण्याच्या दृष्टीने प्रत्येक निर्णयाविषयीची माहिती देवस्थान आणि धार्मिक संस्था महासंघाला द्या !  – धर्मादाय विभागाच्या उपायुक्तांचा आदेश

  • देवस्थान आणि धार्मिक संस्था महासंघाच्या आंदोलनाचा परिणाम !

  • कोल्लुरू देवस्थान व्यवस्था सुधारण्याच्या दृष्टीने धर्मादाय विभागाच्या बैठकीत मंदिर महासंघाचा सहभाग !

उडुपी (कर्नाटक) – कोल्लुरू मुकांबिका देवस्थानाचा कारभार पारदर्शक करण्याच्या दृष्टीने तिथे घेतलेल्या प्रत्येक निर्णयाविषयीची माहिती देवस्थान आणि धार्मिक संस्था महासंघाला देण्यात यावी, असा आदेश धर्मादाय विभागाचे उपायुक्त जयप्रकाश यांनी देवस्थान समितीला दिला. कोल्लुरू मुकांबिका देवस्थानात सार्वजनिक अडचणी, देवस्थानाच्या स्थावर आणि जंगम संपत्तीचे नियोजन (कारभार) यांविषयी, यात्रेकरूंना सोयीसुविधा, घन (सुका), तसेच द्रव (ओला) कचर्‍याची निःसारण व्यवस्था आदी विषयांच्या संदर्भात धर्मादाय विभागाचे उपायुक्त जयप्रकाश यांनी देवस्थानाचे कार्यकारी अधिकारी श्री. महेश, तहसीलदार, देवस्थानाचा कर्मचारी वर्ग, भूमापन विभागाचे अधिकारी यांच्यासमवेत बैठक घेतली. या बैठकीत देवस्थान आणि धार्मिक संस्था महासंघ, कर्नाटक यांनाही सहभागी करून घेण्यात आले होते. या वेळी महासंघाचे सदस्य श्री. मधुसूदन अय्यर, श्री. दिनेश एम्.पी., श्री. चंद्र मोगेर, श्री. श्रीनिवास, हिंदु जनजागृती समितीचे समन्वयक श्री. विजयकुमार आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. विश्‍वनाथ हे सर्व उपस्थित होते. या वेळी जयप्रकाश यांनी हा आदेश दिला.

कोल्लुरू मुकाम्बिका देवस्थानविषयीच्या बैठकीत उपस्थित पदाधिकारी

१. ‘देवस्थान आणि धार्मिक संस्था महासंघ, कर्नाटक’च्या वतीने कोल्लुरू देवस्थानात होत असलेल्या अपव्यवहाराविषयीची माहिती ९ मार्च या दिवशी उडुपी येथे पत्रकार परिषद घेऊन उघड करण्यात आली होती.

२. पत्रकार परिषद झाल्यानंतर अनुमाने १० दिवसांनी कोल्लुरू मुकांबिका देवस्थानात  उपआयुक्त्यांच्या उपस्थितीत सामान्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी अनेक विषयांच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी २० मार्च या दिवशी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या संदर्भात महासंघाच्या वतीने देवस्थानात वर्ष २००५ ते २०१९च्या लेखा परीक्षणाच्या अहवालानुसार काही आक्षेपार्ह सूत्रांविषयी उपायुक्तांसह चर्चा करण्यात आली. या संदर्भात उपायुक्तांनी संबंधित अधिकार्‍यांना धारेवर धरून तत्परतेने याविषयी योग्य कारवाई करण्याचा आदेश दिला.

आक्षेप घेतलेल्या सर्व विषयांच्या संदर्भात योग्य कारवाई करून तेथील व्यवस्था सुरळीत होईपर्यंत लढा चालू राहील ! – गुरुप्रसाद गौडा, प्रवक्ते, देवस्थान आणि धार्मिक संस्था महासंघ, कर्नाटक

देवस्थान आणि धार्मिक संस्था महासंघ, कर्नाटक राज्याचे प्रवक्ते श्री. गुरुप्रसाद यांनी म्हटले की, आमच्या निवेदनाला उपायुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दर्शवला आहे. आतापर्यंत आम्ही आक्षेप घेतलेल्या सर्व विषयांच्या संदर्भात योग्य कारवाई करून तेथील व्यवस्था सुरळीत होईपर्यंत हा लढा चालू राहील.