पोलीस नांदेड येथील प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करतील !

  • पालकमंत्री अशोक चव्हाण यांची पत्रकार परिषद

  • शीख समाजाच्या धार्मिक मिरवणुकीत पोलिसांवर तलवारीने आक्रमण केल्याचे प्रकरण

नांदेडमधील हिंसाचार

नांदेड – येथे शीख समाजाच्या वतीने २९ मार्च या दिवशी काढण्यात आलेल्या ‘हल्लाबोल’ या धार्मिक मिरवणुकीला आडकाठी करणार्‍या पोलिसांवर जमावाने तलवारीने आक्रमण केले असून या प्रकरणामध्ये १४ पोलीस घायाळ झाले आहेत.  पोलिसांवर तलवारीने आक्रमण होणे हे भयानक आहे ‘हा घडलेला प्रकार धक्कादायक आणि दुर्दैवी होता. पोलीस प्रशासन घडलेल्या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करेल’, असे आश्‍वासन पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिले. या प्रकरणाविषयी सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन त्यांनी पत्रकार परिषदेत घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. त्या वेळी ते बोलत होते.