भारतात तिसरी लाट येणे अटळ ! – केंद्र सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार के. विजय राघवन्

भारतात कोरोनाची तिसरी लाट येणे अटळ आहे. सध्याची रुग्णवाढ आणि कोरोनाचा वेगाने होणारा प्रसार पहाता ते होणार आहे. केवळ ही तिसरी लाट कधी आणि किती काळ असेल, हे सांगता येणे कठीण आहे. आपण या तिसर्‍या लाटेसाठी सिद्ध रहायला हवे…..

ममता बॅनर्जी यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ !

ममता बॅनर्जी यांनी ५ मे या दिवशी सकाळी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्या तिसर्‍यांदा मुख्यमंत्री बनवल्या आहेत. या वेळी केवळ त्यांचाच शपथविधी पार पाडला. अन्य मंत्र्यांचा शपथविधी ६ किंवा ७ मे या दिवशी होण्याची शक्यता आहे.

आरोप-प्रत्यारोप करून सत्ताधारी आणि विरोधक यांनी एकमेकांवर खापर फोडले !

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने महाराष्ट्र शासनाने केलेला मराठा आरक्षणाचा कायदा रहित झाला आहे. न्यायालयाच्या या निर्णयानंतर महाराष्ट्रात आरक्षण रहित झाल्याचे खापर एकमेकांवर फोडण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप चालू झाले असून ………

राज्यातील २४ जिल्ह्यांतील कोरोना रुग्णांची वाढ रोखणे, हे आमचे ध्येय ! – राजेश टोपे, आरोग्यमंत्री

मागील २ आठवड्यांशी तुलना केली, तर राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या घटली आहे. राज्यातील १२ जिल्ह्यांमधील कोरोनाची रुग्णसंख्या न्यून झाली आहे; मात्र अद्यापही २४ जिल्ह्यांतील रुग्णांची वाढ कायम आहे.

सोलापूरच्या पालकमंत्र्यांकडून आचारसंहिता असूनही जिल्ह्याकडे दुर्लक्ष केले नसल्याची भूमिका

पोटनिवडणुकीची आचारसंहिता असल्यामुळे कोरोनाविषयी बैठका घेण्यावर आणि उपाययोजनांचे निर्णय घेण्यासाठी अडचण निर्माण होत होती, असे कारण पुढे करून पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पत्रकारांसमोर त्यांची बाजू मांडत सारवासारव केली.

मुख्यमंत्र्यांनी अत्यंत तुटपुंजी तरतूद करून जनतेच्या तोंडाला पाने पुसली ! – चंद्रकांत पाटील, भाजप

रिक्शाचालक प्रत्येक मासात १० सहस्र रुपये कमवतात आणि त्यांना केवळ दीड सहस्र रुपये देऊन त्यांच्याही तोंडाला पाने पुसली आहेत. केवळ निर्बंध लादायचे आणि फारसे साहाय्यही करायचे नाही, अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होण्याची भीती आहे.’’

वाझे प्रकरणात माझा काडीचाही संबंध नाही ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री 

या प्रकरणावरून महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न आहे का ?, याविषयी चौकशी करण्यात यावी, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.

महाराष्ट्रातील घटनांमुळे सर्वसामान्य माणूस निराशेकडे चालला आहे ! – चंद्रकांत पाटील, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, भाजप

“राज्यात कोरोनावरील उपचारांचा गोंधळ उडाला आहे. लसीकरणाचा पत्ता नाही. त्याच्यासाठी प्रयत्न करायचे नाहीत. प्रत्येक विषयात केंद्रशासनाला दोष द्यायचा असेल, तर राज्य केंद्राकडेच चालवायला द्या.”

मालमत्ता कराविषयी विरोधी पक्ष नागरिकांची दिशाभूल करत आहे ! – परेश ठाकूर, सभागृह नेते

वास्तविक मालमत्ता कर आकारणी हा विषय प्रशासनाच्या अखत्यारीतील असतांना विरोधक नाहक सत्ताधार्‍यांची अपर्कीती करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत….

भारतातील सर्व मंदिरे सरकारच्या कह्यातून मुक्त करा ! – गुरुप्रसाद गौडा, कर्नाटक राज्य समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

बेळगाव येथील १६ मंदिरे सरकारने कह्यात घेण्याचे ठरवले. तेव्हा मंदिर विश्‍वस्त, पुजारी आणि हिंदु जनजागृती समिती यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन याला विरोध केला. याचा परिणाम म्हणून २ दिवसांत हा आदेश सरकारने तात्पुरता स्थगित केला.