Tamil Nadu Wakf Board : तमिळनाडू वक्फ बोर्डाच्या अध्यक्षाची पदाचा गैरवापर केल्यावरून चौकशी करावी !

सुफी इस्लामिक बोर्डाची केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे मागणी !

करगणी (आटपाडी) येथे ‘लव्ह जिहाद’ प्रकरणी हिंदु तरुणीचे धर्मांतर आणि हत्या !

लव्ह जिहाद आणि धर्मांतरबंदी कायदा करण्याची आवश्यकता या घटनेतून स्पष्ट होते !

राजामाता जिजाऊ यांची प्रतिमा शासकीय कार्यालयात लावण्यासाठी बंधनकारक करण्यात यावे, यासाठी पाठपुरावा करू ! – धनंजय महाडिक, खासदार, भाजप

राजामाता जिजाऊ यांची प्रतिमा शासकीय कार्यालयात लावण्यासाठी बंधनकारक करण्यात यावे, यासाठी केंद्रीय स्तरावर पाठपुरावा करू, असे आश्वासन भाजपचे खासदार श्री. धनंजय महाडिक यांनी दिले.

तुर्भे येथील वेश्या व्यवसाय बंद करण्यासाठी शिवसेनेकडून पोलीस ठाण्यावर मोर्चा !

वेश्या व्यवसायासारख्या गंभीर सामाजिक समस्या न सोडवणारे प्रशासन जनहिताचे निर्णय कसे घेणार ?

‘प्रेयर हाऊस’च्या नावाखाली धर्मांतर करणार्‍यांवर कारवाई करण्याची हिंदुत्वनिष्ठांची फोंडा (गोवा) पोलिसांकडे मागणी

‘बिलिव्हर्स’च्या विरोधातील कारवाईनंतर गोव्यात नवनवीन नावांनी पास्टर डॉम्निकसारख्या व्यक्ती आणि ‘बिलिव्हर्स’सारख्या संघटना उदयास येऊ लागल्या आहेत. अशा नवनवीन संघटनांवरही सरकारने त्वरित कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

सिंधुदुर्ग : विकलांग तरुणीवरील अत्याचाराच्या प्रकरणातील डॉक्टरवर कारवाईची मागणी

पीडित तरुणी संशयित आरोपीचा घरी घरकामास होती. अत्याचार झाल्यानंतर पीडित तरुणीने तिच्या कुटुंबियांना याची माहिती दिली. त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर ही घटना उघड झाली.

सिंधुदुर्ग : अरुणा धरण प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन ९ व्या दिवशीही चालू

आंदोलनाला ९ दिवस होऊनही संबंधितांकडून कोणतेही ठोस आश्‍वासन देण्यात आले नाही. त्यामुळे १० व्या दिवशी विहिरीविषयी ठोस कार्यवाही झाली नाही, तर आमरण उपोषण करण्याची चेतावणी धरणग्रस्तांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकार्‍यांना दिली आहे.

‘व्हॅलेंटाईन डे’च्या नावाखाली होणारे अपप्रकार रोखण्यासाठी पुणे जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालये येथे निवेदन !

स्वैराचाराचे समर्थन करून तरुण पिढीला चुकीच्या मार्गावर नेण्याचे षड्यंत्र म्हणजे व्हॅलेंटाईन डे ! ‘व्हॅलेंटाईन डे’ ही विकृती असून युवक-युवतींचे जीवन धोक्यात आले आहे.

बजरंग दलाचे निवेदन ‘व्हॅलेंटाईन डे’च्या नावाखाली होणारे अपप्रकार रोखण्यासाठी उपाययोजना करा !

गेल्या काही वर्षांत १४ फेब्रुवारी हा दिवस ‘व्हॅलेंटाईन डे’ म्हणून साजरा करण्याची पाश्चात्त्यांची कुप्रथा भारतातही रुढ झाली आहे.

शाळेतील हिंदु मुलींना कपाळावर टिकली, हातात बांगडी घालू देण्याविषयी अटकाव करू नये !

मुला-मुलींना कपाळावर गंध लावणे, तसेच बांगड्या घालणे यांवर कोणतेच शालेय प्रशासन बंदी आणू शकत नाही. यावर बंधने आणणे म्हणजे घटनेतील तरतुदींवर आक्षेप असण्यासमान आहे