
पेठवडगाव (जिल्हा कोल्हापूर) – मंदिरांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि मंदिरांचे सुव्यवस्थापन करण्याच्या उद्देशाने २४ आणि २५ डिसेंबर २०२४ या दिवशी शिर्डी येथे तृतीय ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद’ आयोजित केली होती; मात्र तिस्ता सेटलवाड आणि फादर सेर्डिक यांच्या ‘सिटीझन फॉर जस्टीस अँड पीस’ (सीजेपी) या संघटनेने परिषदेविरुद्ध खोट्या तक्रारी करून सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. खोट्या तक्रारी करून अपकीर्ती करणार्या ‘सिटीझन फॉर जस्टीस अँड पीस’वर कारवाई करा, या मागणीची तक्रार मंदिर महासंघाच्या वतीने श्री गुरुदत्त स्वामी समर्थ मंदिराचे श्री. मनोहर काटकर यांच्या पुढाकाराने पेठवडगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली.
ही तक्रार पोलीस उपनिरीक्षक सलगर यांनी स्वीकारली. या प्रसंगी मारुति मंदिराचे पुजारी श्री. विजय गुरव, श्रीराम मंदिराचे पुजारी श्री. अनिल सोळशे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. संतोष सणगर, श्री. प्रीतम पवार, सर्वश्री राजेंद्र जाधव, युवराज वाळवेकर, अमोल गोंजारी, रोहित माने, सिद्धार्थ कुंभार उपस्थित होते.
थोडक्यात महत्त्वाचे : ०६.०६.२०२६
‘श्री महालक्ष्मीदेवी मंदिर परिसर विकास आराखड्या’तील १३६ जागांचे सर्वेक्षण पूर्ण ! – डॉ. विजय राठोड, जिल्हाधिकारी, कोल्हापूर
हिंजवडी ‘आयटी पार्क’ मधील ‘थिंकटेक इंडिया’ आस्थापन रातोरात बंद !
आरे परिसरातील ८० एकर जागेत ५ लाख वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ !
श्री महालक्ष्मीदेवी मंदिरासह परिसरातील गड-दुर्ग यांना एकत्र करून ‘टुरिस्ट सर्किट’ करणार ! – शंभूराज देसाई, खनिजकर्ममंत्री
महिला पर्यटकांचे व्हिडिओ काढणार्याला अटक