महाराष्ट्र शासनाने ‘अँटी लँड ग्रॅबिंग (प्रतिबंध)’ कायदा करावा !

मुंबई निवासी उपजिल्हाधिकारी आणि अपर जिल्हादंडाधिकारी यांच्याकडे महाराष्ट्र मंदिर महासंघाची निवेदनाद्वारे मागणी !

हिंदुत्वनिष्ठांकडून निवेदन स्वीकारतांना मुंबई शहर निवासी उपजिल्हाधिकारी आणि अपर जिल्हादंडाधिकारी जयराज कारभारी (डावीकडे)

मुंबई – राज्यात देवस्थानच्या शेतभूमी हडपल्या जात आहेत. या गैरप्रकाराला आळा बसण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘अँटी लँड ग्रॅबिंग (प्रतिबंध)’ कायदा करून कारवाई करावी, त्याची तातडीने कार्यवाही करावी, तसेच राज्यामध्ये भूमी हडपण्याविरोधी विशेष पथकाची नेमणूक करावी या मागण्या महाराष्ट्र मंदिर महासंघाने राज्य सरकारकडे निवेदनाद्वारे केल्या आहेत. या विषयाचे निवेदन मुंबई शहर निवासी उपजिल्हाधिकारी आणि अपर जिल्हादंडाधिकारी श्री. जयराज कारभारी यांना महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या शिष्टमंडळाच्या वतीने देण्यात आले.

निवेदन देतांना ‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’चे संयोजक श्री. सुभाष अहिर, ‘रायगड संवर्धन प्रतिष्ठान’चे अध्यक्ष श्री. राजेंद्र सावंत, ‘मानव सेवा प्रतिष्ठान’चे अध्यक्ष श्री. विनायक शिंदे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. रमेश घाटकर, श्री. गंधर्व ठोंबरे, अधिवक्ता अनिश परळकर, ‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’चे सदस्य श्री. रविंद्र दासारी, हिंदुत्वनिष्ठ श्री. अनिल सिंग, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे संघटक श्री. प्रसाद मानकर उपस्थित होते.