मशिदींवरील ध्वनीक्षेपकाविषयी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाची कार्यवाही करा !

हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे पोलीस निरीक्षकांना निवेदन

पोलीस निरीक्षक एन्.आर्. चौखंडे यांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ

हुपरी (जिल्हा कोल्हापूर) – मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मशिदींवरील ध्वनीक्षेपक (भोंगा) यांच्या संदर्भातील आदेशाची तात्काळ कार्यवाही करावी, या मागणीचे निवेदन पोलीस निरीक्षक एन्.आर्. चौखंडे यांना हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या वतीने देण्यात आले. या वेळी समितीचे श्री. नितीन काकडे, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. अजित सुतार आणि श्री. शिवाजी शिनगारे, छत्रपती ग्रुपचे सर्वश्री सौरभ खोत, संदीप मुधाळे, उमाजी लाड, शुभम चोपडे, अभिनंदन माणकापुरे, बजरंग दलाचे सर्वश्री गौरव नेमिष्टे, श्रावण मुधाळे, सचिन भोसले, ऋषिकेश दिवाण उपस्थित होते.

या वेळी करण्यात आलेल्या मागण्या

१. आपल्या पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील सर्व मशिदींवरील अवैध भोंगे त्वरित हटवण्यात यावेत, तसेच मशिदींमध्ये भोंगे वापरण्यासाठी कोणतीही अनमुती दिली जाणार नाही, याची निश्चिती करावी.

२. अजानसाठी भोंग्यांचा उपयोग न होण्यासाठी नियमित पहारा द्यावा. ध्वनीमर्यादा ओलांडणार्‍या मशिदींवर गुन्हे नोंदवून  भोंगे जप्त करावेत.

३. पोलिसांनी मशिदींमध्ये जाऊन भोग्यांविषयीचे नियम समजावून सांगावेत. नोटीस द्यावी. स्थानिक प्रशासन आणि नगरपालिका यांच्या साहाय्याने मशिदींवरील अवैध भोंगे हटवण्याची मोहीम राबवावी.

४. मशिदींवरील भोंग्यांच्या गैरवापराविषयी नागरिकांच्या तक्रारींसाठी ‘हेल्पलाईन’ किंवा ‘व्हॉट्सॲप क्रमांक’ घोषित करावा आणि प्रत्येक तक्रारींवर २४ घंट्यांच्या आत योग्य ती कारवाई करण्याची हमी द्यावी.

संपादकीय भूमिका

न्यायालयाच्या आदेशाला न जुमानता त्याची कार्यवाहीही न करणार्‍या कर्तव्यचुकार पोलिसांना बडतर्फच करायला हवे !