महापुरुषांचा अपमान करणार्‍यांची जीभ किंवा हात छाटण्याचा कायदा करा ! – शिवप्रेमींची मागणी

छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात अशी मागणी करावी लागणे संतापजनक आहे !

शिरूर (पुणे) येथील २ ख्रिस्ती शाळांमध्ये चालू असलेले धर्मांतराचे प्रयत्न रोखण्यासाठी योग्य ती कारवाई करावी !

हिंदु पालकांनो, ख्रिस्ती शाळांचे खरे स्वरूप जाणून शाळेत होत असलेल्या धर्मांतरास विरोध करा आिण आपली भावी पिढी ‘हिंदु’ म्‍हणून रहाण्‍यासाठी आतापासूनच स्वतःच्या मुलांना धर्मशिक्षण द्या !

‘इज्तिमा’तील मौलानांच्या भाषणाची चौकशी करण्यात यावी ! – बजरंग दल आणि विश्व हिंदु परिषद

खारघर प्रकरणातील आरोपींना त्वरित अटक करण्यात यावी आणि इज्तिमाची चौकशी करावी, अशी मागणी बजरंग दल आणि विश्व हिंदु परिषद यांनी केली आहे. या संदर्भातील एक निवेदन त्यांनी नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांना दिले आहे.

महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने विविध मागण्यांचे मुंबई जिल्हाधिकार्‍यांना निवेदन !

महाराष्ट्र शासनाने ‘अँटी लँड ग्रॅबिंग (भूमी प्रतिबंध) कायदा’ आणण्यासाठी अध्यादेश काढावा, तसेच भूमी हडपण्याविरोधी विशेष पथकांची नेमणूक करावी, या मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या नावे जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.

राज्यात औरंगजेबाचे छायाचित्र किंवा भित्तीपत्रक झळकवण्यावर बंदी घाला !

राज्यात औरंगजेबाचे भित्तीपत्रक, बॅनर लावणे किंवा झळकावणे आदी सर्वांवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या नावे निवेदन देऊन करण्यात आली.

श्री तुळजाभवानी मंदिरात वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेऊ ! – डॉ. सचिन ओंबासे, जिल्हाधिकारी, धाराशिव

या संदर्भात कायदेशीर आणि धार्मिक गोष्टींचा अभ्यास करून निर्णय घेऊ, असे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले आहे.

हुपरी (जिल्हा कोल्हापूर) येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यासाठी अनुमती द्या ! – हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे निवेदन

छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास पुढील पिढीला ज्ञात होण्यासाठी, तसेच परिसरातील युवा पिढीसमोर प्रेरणास्थान निर्माण होण्यासाठी हुपरी येथील सूर्यतलाव येथे छत्रपती श्री संभाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यास अनुमती देण्यात यावी

विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्याची मोहीम तात्काळ चालू करा ! – महसूलमंत्र्यांचे कोल्हापूर जिल्हाधिकार्‍यांना आदेश

विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्याची मोहीम तात्काळ चालू करा, असे आदेश राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. विशाळगडावर १५७ अतिक्रमणे असून ९० अतिक्रमणे प्रशासनाने तोडली आहेत

मशिदींवरील ध्वनीक्षेपकाविषयी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाची कार्यवाही करा !

न्यायालयाच्या आदेशाला न जुमानता त्याची कार्यवाहीही न करणार्‍या कर्तव्यचुकार पोलिसांना बडतर्फच करायला हवे !

‘बांगलादेशी घुसखोर शोध मोहिमे’स गती देण्यासाठी हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे अकोला जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

प्रशासनाने बांगलादेशी घुसखोरांविरोधात कठोर पावले उचलावीत, अशी मागणी हिंदु राष्ट्र समन्वय समिती आणि हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ते यांनी जिल्हाधिकारी श्री. अजित कुंभार यांना निवेदनाद्वारे केली. या संदर्भात आंदोलन करण्याची चेतावणीही या निवेदनात देण्यात आली आहे.