Boats Carrying Migrants Sank : मुसलमान शरणार्थींना घेऊन जाणार्‍या २ नौका इटलीजवळ बुडाल्‍या !

११ जणांचा मृत्‍यू, ६४ बेपत्ता !

शरणार्थींची सुटका करतांना वैद्यकिय पथक

रोम (इटली) – इटलीच्‍या किनारपट्टीवर भूमध्‍य समुद्रात २ नौका बुडाल्‍याचे समोर आले आहे. यात ११ जणांचा मृत्‍यू झाला, तर २६ मुलांसह ६४ जण बेपत्ता आहेत. आतापर्यंत ५१ लोकांची सुटका करण्‍यात आली आहे. जर्मन संस्‍था ‘रेस्‍कशिप’ने ही माहिती दिली. ‘बीबीसी’ने दिलेल्‍या माहितीनुसार ही नौका लिबियातून निघाली होती. त्‍यात सीरिया, इजिप्‍त, बांगलादेश आणि पाकिस्‍तान येथील मुसलमान शरणार्थी होते.

. अन्‍य एका घटनेत इटलीच्‍या दक्षिणेकडील कॅलाब्रियाच्‍या किनार्‍यापासून २०१ किमी अंतरावर आणखी एक नौका बुडाली. या नौकेतील शरणार्थी इराण, सीरिया, इराक आणि अफगाणिस्‍तान येथील असल्‍याची माहिती संयुक्‍त राष्‍ट्रांनी दिली आहे.

२. यापूर्वी १२ जूनला काँगोमध्‍ये प्रवाशांनी भरलेली नौका नदीत बुडाल्‍याने ८० हून अधिक लोकांचा मृत्‍यू झाला होता, तर ११ जूनला एडनच्‍या किनार्‍याजवळ शरणार्थींनी भरलेली एक नौका उलटली. यात ४९ लोक मरण पावले, तर १४० हून अधिक लोक बेपत्ता झाले.

. संयुक्‍त राष्‍ट्रांच्‍या अहवालानुसार भूमध्‍य समुद्र हा शरणार्थींचा सर्वांत धोकादायक मार्ग आहे. प्रतिवर्षी १ लाखाहून अधिक शरणार्थी यामार्गे इटलीत येतात. गेल्‍या १० वर्षांत या मार्गावरून जाणार्‍या २७ सहस्रांहून अधिक शरणार्थींचा मृत्‍यू झाला आहे.