सरकार संविधान बदलणार असल्याच्या नुसत्या अफवा ! – केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले

नगर – आताचे सरकार आदिवासी आणि मागासवर्गीय आरक्षणाला पाठिंबा देणारे आहे; मात्र काही लोक राजकीय आकसापोटी सरकार संविधान बदलणार असल्याची अफवा पसरवत आहे; पण मी सरकारमध्ये असेपर्यंत संविधानाला हात लावू देणार नाही. त्यामुळे आदिवासी मागासवर्गीयांचे आरक्षण बदलण्याचा प्रश्न येत नसल्याचे उद्गार केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी राजूर येथे माजी मंत्री मधुकर पिचड यांच्या निवासस्थानी बोलतांना काढले.

भंडारदरा जलाशय होतांना विस्थापित झालेल्या आदिवासींचे पुनर्वसन करण्यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करू आणि भंडारदरा जलाशयाचे नाव पालटून क्रांतीवीर राघोजी भांगरे करावे यासाठी आग्रही राहू, असे आश्वासनही त्यांनी या वेळी दिले.