चित्रपट करमुक्त करा ! – भाजप चित्रपट कामगार आघाडी, सातारा

जिल्हाधिकारी शेखर सिंह (डावीकडे) यांना निवेदन देतांना भाजपचे पदाधिकारी

सातारा, १६ मार्च (वार्ता. ) – नुकताच प्रदर्शित झालेला हिंदी चित्रपट ‘द कश्मीर फाइल्स’ आणि मराठी चित्रपट ‘पावनखिंड’ हे दोन्ही चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत; मात्र याचे तिकीटदर सामान्य लोकांना न परवडणारे आहेत. त्यामुळे हे चित्रपट लोकांना पहायला मिळणार नाहीत. यासाठी हे दोन्ही चित्रपट करमुक्त करण्यात यावेत, अशी मागणी ‘भाजप चित्रपट कामगार आघाडी’च्या वतीने जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे करण्यात आली आहे.
या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे देण्यात आले. या वेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, ‘भाजप चित्रपट कामगार आघाडी’चे जिल्हाध्यक्ष विकास बनकर, शहराध्यक्ष विकास गोसावी, नगरसेवक विजयकुमार काटवटे, दीपाली देशमाने आदी मान्यवर आणि कार्यकर्ते उपस्थित होते.