लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) येथे धार्मिक स्थळांपासून १०० मीटरच्या परिसरामध्ये मांसविक्रीवर बंदी !

शहरामध्ये धार्मिक स्थळांपासून १०० मीटरच्या परिसरात मांसविक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. मांसाहारी पदार्थांची विक्री करणारी दुकाने आणि उपाहारगृहे यांच्यावर प्रतिबंध घालण्यात येत असल्याची घोषणा महापौर संयुक्ता भाटिया यांनी केली आहे.

आसाममध्ये धर्मांधांनी केलेल्या हिंदूंच्या हत्यांचे समर्थन करणार्‍या काँग्रेसच्या धर्मांध आमदाराला अटक !

हिंदूंच्या हत्यांचे समर्थन करणार्‍या काँग्रेसच्या धर्मांध आमदाराला फाशीची शिक्षा झाली पाहिजे ! यासाठी राज्यातील भाजप सरकारने प्रयत्न केला पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !

डॉ. विजय जोशी यांना ऑस्ट्रेलियन सरकारचा ‘ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया’ हा मानाचा पुरस्कार प्रदान !

विद्वान आणि हुशार भारतीय संशोधक, तज्ञ हे संशोधक वृत्तीने अन् कष्ट करून संशोधन करतात; मात्र भारतात त्याला योग्य प्रतिसाद न मिळाल्यामुळे ते विदेशाची वाट धरतात. प्रज्ञावंतांचा हा उपहास टाळण्यासाठी शासनकर्त्यांनी प्रयत्न करायला हवेत !

निवडणूक प्रचारात अधिकची रक्कम व्यय केल्यामुळे फ्रान्सच्या माजी राष्ट्रपतींना शिक्षा !

निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या रकमेपेक्षा अधिकची रक्कम निवडणुकीत व्यय केल्याच्या प्रकरणी फ्रान्सचे माजी राष्ट्रपती निकोलस सर्कोझी यांना न्यायालयाने १ वर्षांची कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

‘ऑनलाईन मोडी लिपी’ कार्यशाळेचे आयोजन !

प्राचीन लिपी मोडी प्रशिक्षण केंद्र, मुंबई यांच्या वतीने ३ ऑक्टोबर २०२१ या दिवशी रात्री ७ ते ८.३० या वेळेत ऑनलाईन मोडी लिपी कार्यशाळेचे आयोजन केले आहे. आगाऊ नाव नोंदणी आवश्यक आहे.

बालगंधर्व नाट्यगृह सुधारणाकामात सांगली महापालिका आयुक्त आणि संबंधित नगरसेवक यांच्या पाठपुराव्यामुळे गती ! – श्रेयस गाडगीळ

बालगंधर्व नाट्यगृहात सुधारणा होण्यासाठी विविध रंगकर्मींनी सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेचे आयुक्त यांचा पाठपुरावा केला होता.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात ‘ढोल वाजवा’ आंदोलन !

महाविकास आघाडी सरकार महिला अत्याचाराविरुद्ध कुठलीही भक्कम कारवाई करण्यात अपयशी ठरले आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात ‘ढोल वाजवा’ आंदोलन करण्यात आले.

विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समितीस साहाय्य करण्याचा यळगुड (जिल्हा कोल्हापूर) येथील श्री हनुमान सहकारी दूध व्यावसायिक आणि कृषिपूरक सेवा संस्थेचा ठराव !

विशाळगडाचे जतन व्हावे यासाठी कृती समितीस सर्वाेतोपरी साहाय्य करण्याचा ठराव संस्थेने केला आहे.

कोल्हापूर युवासेनेच्या वतीने ‘चेतना संस्था’ येथील गतिमंद मुलांच्या शाळेला स्वच्छता साहित्य भेट !

कोल्हापूर युवासेनेच्या वतीने युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने ‘चेतना संस्था’ येथील गतिमंद मुलांच्या शाळेला २३ सप्टेंबरला स्वच्छता साहित्य भेट देण्यात आले.

नवीन मतदार नाव नोंदणी अभियानाचा नागरिकांनी लाभ घ्यावा ! – कुबेरसिंह राजपूत, शिवसेना

१८ वर्षे पूर्ण झालेल्या नवमतदारांचे नाव मतदारसुचीत येण्यासाठी शिवसेनेच्या वतीने नवीन मतदार नाव नोंदणी अभियान राबवण्यात येत आहे. हे अभियान ३० सप्टेंबरअखेर चालू असणार आहे.