
‘तुम्ही पाहिजे ते लिहा, तुम्हाला स्वातंत्र्य आहे; पण प्रथम नीट अभ्यास करा आणि लिहा. सत्य-असत्याशी मन ग्वाही ठेवून लिहा. कुणाच्या तरी हातचे बाहुले होऊन केवळ वेतनभोगी वृत्तीने लिहू नका. तुमच्यावर पुष्कळ मोठे दायित्व आहे, ते सामाजिक स्वरूपाचे आहे. आपल्या लिहिण्याने कुणाचा बुद्धीभेद तरी होणार नाही, याची काळजी घ्या. चांगल्याला चांगले आणि वाईटाला वाईट म्हणण्याचे धाडस ठेवा. सत्याचा अपलाप नको, अर्धसत्य लिहू नका.’
(प.पू. स्वामी वरदानंद भारती यांनी काही वर्षांपूर्वी पंढरपूर येथील पत्रकार प्रबोधन शिबिरास पत्रकारांना केलेले मार्गदर्शन)
संकलक : श्री. योगेश काटे
– प.पू. स्वामी वरदानंद भारती