औरंगजेबाच्या कबरीची तुलना संत निवृत्तीनाथांच्या समाधीशी केल्याचे प्रकरण
नाशिक – औरंगजेब हा हिंदुस्थानचा बेताज बादशहा होता, असे म्हणत त्याच्या कबरीची संत निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधीशी तुलना केल्याप्रकरणी अजित पवार गटाचे त्र्यंबकेश्वर शहराध्यक्ष किरण चौधरी याला अटक करण्यात आली, तसेच त्याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
किरण चौधरी हा काही मुसलमानांना घेऊन खुलताबाद येथे औरंगजेबाच्या कबरीवर गेला होता. त्यानंतर त्र्यंबकेश्वर येथील मुसलमान मित्राला त्याने संपर्क करून सांगितले, ‘खुलताबाद येथे औरंगजेबाची कबर पाहून मी अचंबित झालो. तो हिंदुस्थानचा बेताज बादशहा होता.’ या वेळी त्याने संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या समाधीची औरंगजेबाच्या कबरीशी तुलना केली. याविषयीची ध्वनीफीत प्रसारित झाल्याने हिंदू संतप्त झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी वरील कारवाई केली.
त्र्यंबकेश्वर येथील श्री संत निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थानच्या व्यवस्थापकांनी पोलिसांकडे लेखी तक्रार करून चौधरीच्या विरुद्ध कारवाईची मागणी केली आहे.
संपादकीय भूमिका :हिंदु धर्मातील संतांचा अवमान करणार्यांना कठोर शिक्षा दिल्याविना हे प्रकार थांबणार नाहीत ! |