‘महाराज’ चित्रपटातून हिंदु धर्माविषयीची नकारात्मक दृश्ये हटवा ! – बजरंग दलाची चेतावणी

‘महाराज’ हा चित्रपटाचे भित्तीपत्रक

बेंगळुरू – अभिनेते आमीर खान यांचा मुलगा जुनैद खान याची प्रमुख भूमिका असलेला, तसेच ‘यशराज फिल्म्स’ची निर्मिती असलेला ‘महाराज’ हा चित्रपट  ‘नेटफ्लिक्स’ या ओटीटी (या अ‍ॅप्सवरून चित्रपट अथवा अन्य कार्यक्रम पहाण्याची सुविधा असते) मंचावर १४ जून या दिवशी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची कथा हिंदूविरोधी असल्यामुळे तो विवादात सापडला आहे. ‘या चित्रपटात हिंदु धर्म आणि श्रीकृष्ण यांच्याविषयी नकारात्मक दृश्ये दाखवण्यात आली आहेत. ही आक्षेपार्ह दृष्ये हटवण्यात यावी’, अशी मागणी बजरंग दलाने केली आहे. सिद्धार्थ मल्होत्रा हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. ‘या चित्रपटात हिंदु धर्मगुरूंना खलनायक दाखवण्यात आले आहे. (इस्लाम किंवा ख्रिस्ती धर्मगरू यांना नकारात्मक स्वरूपात दाखवण्याचे धारिष्ट्य मल्होत्रा यांच्यासारखे दिग्दर्शक का करत नाहीत ? – संपादक) या चित्रपटात हिंदूंचे धर्मांतर केल्याची दृश्येही दाखवण्यात आली आहेत. ही दृष्ये हटवली नाहीत, तर चित्रपटाला विरोध करू’, अशी चेतावणी बगरंग दलाने दिली आहे.

संपादकीय भूमिका

हिंदूबहुल देशात हिंदुत्वनिष्ठ संघटनांवर अशी चेतावणी देण्याची वेळ का येते ? अशा चित्रपटांवर बंदी घालण्यासह त्यांची निर्मिती करणारे, त्यात अभिनय करणारे आणि असे चित्रपट दिग्दर्शित करणार्‍यांवरही कारवाई करणे आवश्यक !