शिर्डीच्‍या साईबाबांच्‍या विरोधात आक्षेपार्ह व्‍हिडिओ प्रसारित करणार्‍या तिघांवर गुन्‍हा नोंद !

नगर – शिर्डीच्‍या साईबाबांच्‍या विरोधात आक्षेपार्ह ‘व्‍हिडिओ’ प्रसारित करण्‍यात आला. या प्रकरणी शिर्डी येथील साईभक्‍त शिवाजी गोंदकर यांच्‍या तक्रारीवरून भाग्‍यनगरच्‍या तिघांवर गुन्‍हा नोंद करण्‍यात आला आहे. गिरिधर स्‍वामी, हिरालाल काबरा आणि आणखी एका व्‍यक्‍तीचा संशयितांमध्‍ये समावेश आहे. व्‍हिडिओमध्‍ये हिंदु आणि मुसलमान धर्मात तेढ निर्माण होईल, असे वक्‍तव्‍य केले आहे. त्‍यामुळे पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. या प्रकरणी पोलिसांनी अन्‍वेषण चालू केले आहे.

देवतांविषयी वादग्रस्‍त वक्‍तव्‍ये करणे टाळा. सामाजिक माध्‍यमावर २ धर्मात आणि समुदायात तेढ निर्माण करणार्‍या पोस्‍ट करू नका. अन्‍यथा कठोर कारवाई करण्‍यात येईल, अशी चेतावणी पोलिसांनी दिली आहे.