(म्हणे) ‘संतांचा अवमान करणार्‍यांना महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही !’ – नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

मुंबई, १७ मार्च (वार्ता.) – बागेश्वर धामचे सरकार पंडित धीरेंद्र शास्त्री महाराज या बाबाचा मीरा रोड येथे कार्यक्रम होत आहे. त्यांनी काय प्रवचन करावे ? हा त्यांचा अधिकार आहे; परंतु या व्यक्तीने जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्याविषयी अवमान करणारे विधान करूनही शिंदे सरकार त्यावर कारवाई का करत नाही ? संतांचा अवमान करणार्‍यांना आम्ही महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही, अशी चेतावणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी १७ मार्च या दिवशी विधानसभेत दिली.

ते म्हणाले की, आम्हाला आमचे संत महत्त्वाचे आहेत. त्यांचा अवमान आम्ही सहन करणार नाही. संतांना आपल्या जीवनात महत्त्वाचे स्थान आहे. अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पाचा प्रारंभही संत तुकाराम महाराज यांच्या अभंगानेच केला होता. संतांच्या विचारात पुष्कळ सामर्थ्य आहे. भ्रष्ट विचाराचे कुणी स्वतःलाच संत म्हणून घेत असेल, तर ते योग्य नाही. आमच्यासाठी संत तुकाराम महाराज हे सर्वश्रेष्ठ आहेत. महाराष्ट्रात येऊन जर संत तुकाराम महाराज यांचा कुणी अवमान करत असेल, तर ते अजिबात चालणार नाही.