‘अ‍ॅमेझॉन प्राईम’च्या प्रमुखांसह ‘तांडव’चे निर्माता-दिग्दर्शक, लेखक आदींविरुद्ध गुन्हे नोंद

केंद्र सरकारने समन्स बजावण्यात वेळ न घालवता थेट या वेब सिरीजवर बंदी घालून वेब सिरीजवर नियंत्रण ठेवण्यासाठी सेन्सॉर बोर्ड स्थापन करावा, अशीच हिंदूंची मागणी आहे !

हिंदूंच्या देवतांचा अवमान करणार्‍या ‘तांडव’ वेब सिरीजवर बंदी घाला !  

‘निधर्मी’ भारतात कुणीही ऊठसूठ हिंदूंच्या देवतांच्या मूर्ती फोडतो, हिंदूंचे धर्मग्रंथ जाळतो, देवतांची टिंगळटवाळी करतो, वेब सिरीज, चित्रपट, नाटक, विज्ञापने यांच्या माध्यमांतून देवतांचे विडंबन करतो; पण बहुसंख्य हिंदूंना काही वाटत नाही, हे दुर्दैव !

अयोध्या येथील राममंदिर जगाची सांस्कृतिक राजधानी बनेल ! – मिलिंद परांडे

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्या वतीने अयोध्येतील राममंदिर निर्माण कार्य आता गतिमान झाले आहे. अयोध्येतील राममंदिर संपूर्ण जगाची सांस्कृतिक राजधानी बनेल, असा विश्‍वास विश्‍व हिंदु परिषदेचे अखिल भारतीय महामंत्री मिलिंद परांडे यांनी पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केला. 

कराड (जिल्हा सातारा) येथे अत्यंत उत्साहात पार पडला शिवस्पर्शदिन 

ऐतिहासिक आणि स्फूर्तिदायक घटनेचे स्मरण करण्यासाठी कराड येथील शिवभक्तांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे आगमन झाले तो दिवस अर्थात शिवस्पर्शदिन अत्यंत उत्साहात पार पडला.

श्रीलंकेमध्ये महिला अधिवक्त्याकडून फेसबूकवर श्री महाकाली देवीचे अश्‍लील चित्र पोस्ट करून अवमान

केवळ श्रीलंकेतीलच नव्हे, तर भारतातील हिंदूंनीही यास विरोध केला पाहिजे. तसेच भारत सरकारने जगात कुठेही हिंदूंच्या श्रद्धास्थानांचा अवमान होत असेल, तर त्याची तात्काळ नोंद घेत तो रोखण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, असे हिंदूंना वाटते !

भारतातील हिंदूंनीही विरोध करावा !

श्रीलंकेतील अधिवक्त्या जीवनी करियावसम् यांनी श्री महाकालीदेवीचे अश्‍लील चित्र फेसबूकवर पोस्ट केल्याच्या कृत्याला येथील हिंदु संघटनांनी विरोध केला आहे. जीवनी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी या संघटनांनी केली आहे.

‘शिव-समर्थ’ शिल्प कुणाच्याही दबावाला बळी पडून हटवण्यात येऊ नये !

विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि संप्रदाय यांची प्रशासनाकडे मागणी

‘कल्पवृक्ष’ आस्थापनाने संकेतस्थळावरील विक्रीतून म.फि. हुसेन यांची चित्रे वगळली !

हिंदूंनी वैध मार्गाने संघटितपणे विरोध केल्यास यश मिळते याचे हे आणखी एक उदाहरण ! याविषयी हिंदूंनी ईश्‍वराच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करावी !

पाकच्या ‘आय.एस्.आय.एस्.’शी संबंध असलेल्या ‘पी.एफ्.आय.’वर गोव्यात बंदी का नाही ? – प्रा. सुभाष वेलींगकर

प्रखर हिंदुत्वनिष्ठ प्रमोद मुतालिक यांच्या गोवा प्रवेशबंदीत २ मासांनी वाढ केली आहे.

‘अ‍ॅमेझॉन’ आस्थापनावर महाराष्ट्रासह भारतात बंदी घाला !

प्रसिद्धीसाठी हिंदूंच्या भावना दुखावून हिंदु देवतांचा अपमान केल्यास आम्ही खपवून घेणार नाही. या आस्थापनावर बहिष्कार टाकून खर्‍या अर्थाने निषेध व्यक्त करावा, असे आवाहन अखिल भाविक वारकरी मंडळाच्या वतीने करण्यात आले.