Golden Temple Attack : अमृतसरच्या (पंजाब) सुवर्ण मंदिरात झुल्फान याने भाविकांवर केले आक्रमण : ५ जण घायाळ

घायाळ भाविक

अमृतसर (पंजाब) – येथील सुवर्ण मंदिरात शिखांचे नववर्ष साजर्‍या करणार्‍या ५ भाविकांवर हरियाणातील यमुनानगर येथील रहिवासी असणार्‍या झुल्फान नावाच्या तरुणाने लोखंडी सळीने आक्रमण केले. यात ३ भाविक आणि सुवर्ण मंदिराचे २ सेवेकरी असे ५ जण घायाळ झाले. यातील एक भक्त आणि एक सेवेकरी यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. सी.सी.टी.व्ही. फुटेजच्या साहाय्याने झुल्फान याला पकडून पोलिसांच्या हातात देण्यात आले. या घटनेनंतर सुवर्ण मंदिरातील भाविकांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. पोलिसांनी तपासणी वाढवली आहे.

संपादकीय भूमिका

या घटनेविषयी खलिस्तान समर्थक गप्प का ?