
मोगा (पंजाब) – येथे शिवसेनेचे (शिंदे गट) नेते मंगत राम यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. पोलीस आरोपींचा शोध घेत होते. १४ मार्चच्या रात्री हत्या करणार्या तिघांसमवेत पोलिसांची चकमक उडाली. यानंतर पोलिसांनी अरुण गुरप्रीत सिंह, अरुण बब्बू सिंह आणि राजवीर अशोक कुमार या तिघांना अटक केली. चकमकीत हे आरोपी घायाळ झाल्याने त्यांना उपचारासाठी मलौट येथील रुग्णालयामध्ये भरती करण्यात आले आहे. ही हत्या वैयक्तिक वादातून झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
संपादकीय भूमिकाअशांवर जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीचीच शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न केला पाहिजे ! अशा शिक्षेनंतरच अन्य गुन्हेगारांवर वचक बसेल ! |