‘अ‍ॅमेझॉन प्राईम’च्या प्रमुखांसह ‘तांडव’चे निर्माता-दिग्दर्शक, लेखक आदींविरुद्ध गुन्हे नोंद

  • तांडव वेब सिरीजमधून हिंदूंच्या देवतांचा अवमान

  • केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून समन्स

केंद्र सरकारने समन्स बजावण्यात वेळ न घालवता थेट या वेब सिरीजवर बंदी घालून वेब सिरीजवर नियंत्रण ठेवण्यासाठी सेन्सॉर बोर्ड स्थापन करावा, अशीच हिंदूंची मागणी आहे !

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणी ‘तांडव’ या वेब सिरीजचे निर्माते हिमांशू कृष्ण मेहरा, दिग्दर्शक अली अब्बास जाफर, लेखक गौरव सोलंकी, ‘अ‍ॅमेझॉन प्राईम’च्या भारतातील ‘ओरिजनल कटेंन्ट हेड’ अपर्णा पुरोहित यांच्याविरोधात येथील हजरतगंज कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यापूर्वी मुंबईतही अशा प्रकारचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

यूपी: वेब सीरीज ‘तांडव’ के खिलाफ लखनऊ में दर्ज हुआ मुकदमा, लगे हैं ये आरोप

भाजपचे खासदार मनोज कोटक यांनी थेट केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्र लिहून ‘तांडव’वर बंदी घालण्याची, तसेच ‘ओटीटी अ‍ॅप’साठी  सेन्सॉर बोर्ड निर्माण करण्याची मागणी केली होती.

 (सौजन्य : TIMES NOW)

कोटक यांच्या पत्राची तात्काळ नोंद घेत या मंत्रालयाने ‘अ‍ॅमेझॉन प्राईम’च्या भारतातील अधिकार्‍यांना समन्स बजावून या वेब सिरीजमधील हिंदु देवतांचा अवमान आणि धार्मिक भावना दुखावल्याविषयी स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे.