Gwalior Missionaries Conversion Racket : बजरंग दलाच्या सतर्कतेमुळे मध्यप्रदेशातील हिंदूंच्या धर्मांतराचा प्रयत्न फसला !

  • पोलिसांनी १८ हिंदूंची केली सुटका

  • पंजाबमधील चर्चमध्ये केले जाणार होते धर्मांतर

  • पैसा, तसेच विदेशात नोकरी देण्याचे दाखवले गेले आमीष

पाताळकोट एक्सप्रेसमधील हिंदूंची सुटका

ग्वाल्हेर (मध्यप्रदेश) – येथील गरीब हिंदूंना पंजाबमधील जालंधर येथील चर्चमध्ये नेऊन तेथे त्यांचे धर्मांतर करण्याचा ख्रिस्त्यांचा प्रयत्न बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे फसला. या प्रकरणी पोलिसांनी १२ मार्चला रात्री उशिरा पाताळकोट एक्सप्रेसमधील १८ हिंदूंची सुटका केली. ते सर्व कामगार वर्गातील होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार छिंदवाडा येथील सेजनाथ सूर्यवंशी आणि विजय कुमार या दोघांनी या कामगारांना ‘तुम्ही ख्रिस्ती धर्म स्वीकारला, तर आम्ही तुम्हाला प्रत्येकी १ लाख रुपये देऊ, तुमच्या मुलांना चांगल्या ख्रिस्ती शाळांमध्ये शिक्षण देऊ आणि त्यांना विदेशात नोकरीही देऊ’, असे आमीष दाखवले. या आमिषाला भुलून १८ जण धर्मांतर करण्यासाठी दोघा ख्रिस्त्यांच्या समवेत पाताळकोट एक्सप्रेसमधून जालंधर येथे जात होते.

अटक करण्यात आलेला आरोपी

बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना ही माहिती मिळताच त्यांनी पोलिसांना ती दिली. पोलिसांनी तात्काळ विदिशातील गंजबासोडा रेल्वे स्थानकावर पाताळकोट एक्सप्रेस थांबवली आणि ११ प्रवाशांना कह्यात घेतले. यानंतर बीना रेल्वे स्थानकावर आणखी ४ प्रवाशांना कह्यात घेण्यात आले. यानंतर पोलिसांना एस्-१ क्रमांकाच्या डब्यात आणखी ३ जण असल्याची माहिती मिळाली. पोलीस येण्याची कुणकुण लागताच हे तिघे जण पळून जाण्याच्या सिद्धतेत असतांना पोलिसांनी ग्वाल्हेर रेल्वे स्थानकावर गाडीला थांबवून त्यांना कह्यात घेतले. पोलीस या प्रकरणाचे सखोल अन्वेषण करत आहेत.

संपादकीय भूमिका

  • मध्यप्रदेशात धर्मांतरबंदी कायदा असूनही तेथील ख्रिस्ती हे हिंदूंचे धर्मांतर करण्यात गुंतले आहेत, याचा अर्थ मुसलमानांप्रमाणेच धर्मांध ख्रिस्तीही कायद्याला जुमानत नाहीत, हेच स्पष्ट होते. यावरून नुसता कायदा करून नव्हे, तर त्यामध्ये कठोर शिक्षेचे प्रावधान करून त्याची तशी अंमलबजावणी करणे अत्यावश्यक आहे !
  • जी सतर्कता हिंदु कार्यकर्ते दाखवू शकतात, ती पोलीस का दाखवू शकत नाहीत ?
  • हिंदूंना स्वधर्माचे शिक्षण घेऊन त्यांचा धर्माभिमान वाढवणे, हाच त्यांचे धर्मांतर रोखण्याचा प्रभावी उपाय !