हिंदु धर्म, देवता आदींचा होणारा अवमान रोखण्यासाठी ईशनिंदा कायदा करा !

  • ट्विटरवरून धर्माभिमान्यांची मागणी

  • #IndiaWants_BlasphemyLaw हा  ट्रेंड राष्ट्रीय ट्रेंडमध्ये दुसर्‍या क्रमांकावर !

मुंबई – गेल्या अनेक वर्षांपासून नाटक, चित्रपट, विज्ञापने आदींच्या माध्यमांतून हिंदु देवता, साधू, संत आदींचा अवमान करण्यात येत आहे. याचा हिंदूंकडून विरोधही केला जात आहे; मात्र याविरोधात कठोर कायदा नसल्याने आरोपींवर कठोर कारवाई करण्यास मर्यादा येत आहेत. नुकतेच तांडव या वेब सिरीजमधून भगवान श्रीराम आणि शिव यांचा अवमान करण्यात आला होता. अशा घटना सातत्याने घडत असल्याने धर्माभिमान्यांकडून ट्विटरवर #IndiaWants_BlasphemyLaw हा हॅशटॅग ट्रेंड करण्यात आला होता. तो राष्ट्रीय ट्रेंडमध्ये दुसर्‍या क्रमांकावर होता. तसेच #ईशनिंदा_कानून_चाहिए हाही एक हॅशटॅग ट्रेंड करण्यात आला. तो चौथ्या क्रमांकावर होता. यावर ३५ सहस्रांहून अधिक ट्वीट्स करण्यात आले होते. या ट्रेंडद्वारे ईशनिंदा कायदा तात्काळ लागू करण्याची, तसेच संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

हिंदु जनजागृती समितीद्वारे ऑनलाईन पिटीशन

या संदर्भात हिंदु जनजागृती समितीने तिच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अभियान चालू केले आहे. याद्वारे ईशनिंदा कायदा देशात लागू करण्यासाठी केंद्र सरकारला थेट ई-मेल करण्याची सुविधा करण्यात आली आहे. याची मार्गिका (लिंक) पुढीलप्रमाणे आहे.

https:/www.hindujagruti.org/hindi/hindu-issues/india-wants-blasphemy-law