पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंती समारोहात खासदार डॉ. सुधांशु त्रिवेदी यांना ‘हलाल जिहाद’ ग्रंथ भेट !

या कार्यक्रमामध्ये हिंदु जनजागृती समितीच्यावतीने त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी राष्ट्र आणि धर्म यांवर होणार्‍या आघातांविषयी चर्चा केली. त्यांना समितीचा ‘हलाल जिहाद ?’ हा हिंदी भाषेतील ग्रंथ, तसेच हलाल प्रमाणपत्र रहित करण्याच्या प्रक्रियेसंबंधीचे निवेदन देण्यात आले.

गोव्यातील पोर्तुगीज नावे पालटण्याच्या कामाला ‘वास्को’ नाव पालटण्यापासून प्रारंभ करा ! – प्रा. सुभाष वेलिंगकर, ‘भारत माता की जय’ संघ

संपूर्ण देशात शहर किंवा एखादा परिसर यांची नावे पालटण्याच्या मोहिमेला प्रारंभ झालेला आहे. ‘बाम्बे’चे नाव मुंबई, ‘बेंगलोर’चा उल्लेख ‘बेंगळुरू’, मद्रासचे नाव ‘चेन्नई’ असा करण्यात आले आहे. गोव्यातही नामांतराची ही मोहीम राबवली पाहिजे.

तिबेट समस्येच्या निराकरणासाठी ज्यांना मला भेटायचे आहे, ते येऊ शकतात ! – दलाई लामा यांचे आवाहन

असे विधान तिबेटचे बौद्ध धर्मगुरु दलाई लामा यांनी केले असून त्या माध्यमातून चीनशी चर्चा करण्याचे सुतोवाच केले. ते कांगडा विमानतळावर पत्रकारांशी बोलत होते.

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी वीर सावरकर यांच्या विचारांनी कार्य करायला हवे ! – रणजित सावरकर, कार्याध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदूंनी वेळ द्यावा. हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी कार्य करायचे असेल, तर प्रथम आपण हिंदु राष्ट्राची संकल्पना समजून घ्यायला हवी. हिंदु राष्ट्र स्थापन करायचे असेल, तर आपणाला वीर सावरकर यांच्या विचारांनी कार्य करायला हवे.

कर्नाटकातील काँग्रेस म्हणजे हुकूमशाही वृत्तीचे हिटलर सरकार  ! – चक्रवर्ती सुलीबेले, संस्थापक, युवा ब्रिगेड, बेंगळुरू

हा कार्यक्रम होऊ नये, यासाठी प्रयत्न करण्यात आला होता. त्यावरून सुलीबेले यांनी राज्य सरकारवर टीका केली.

प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात नगर येथील सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटना एकवटल्या !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नगर येथील पेमराज सारडा महाविद्यालयाच्या सभागृहात नुकत्याच झालेल्या ‘प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’चे आयोजन करण्यात आले.

अजूनही हिंदू एक होत नाहीत ! – शरद पोंक्षे यांची खंत

हिंदू अजून एक होत नाहीत. जागे होत नाहीत, यासारखे दुःख नाही. ऐकूया सावरकर, वाचूया सावरकर. आपण सगळ्यांनी एक होऊया. हिंदु धर्मातील सर्व जाती संपवून ‘हिंदु’ ही एकमेव जात निर्माण करूया. हेच या माणसाने स्वप्न पाहिले. ते आपण पूर्ण करूया.

विश्व हिंदु परिषदेचे प्रांत मंडळाचे मार्गदर्शक सदस्य ह.भ.प. प्रकाश महाराज कठाळे यांचे अपघाती निधन

विश्व हिंदु परिषदेचे प्रांत प्रमुख डॉ. सुरेशराव चिकटे यांनी सांगितले, ‘‘ह.भ.प. प्रकाश महाराज कठाळे यांनी कथा, प्रवचन या माध्यमांतून हिंदूसंघटनासाठी कार्य करून संपूर्ण आयुष्य हिंदु धर्मरक्षणासाठी वेचले. धर्मातील अशी विभूती जाण्याने आध्यात्मिक क्षेत्रात मोठी हानी झाली आहे.’’

हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्याची हत्या करणार्‍याची माहिती देणार्‍याला ५ लाख रुपयांचे बक्षीस घोषित !

एन्.आय.ए.चे अधिकारी या प्रकरणातील प्रमुख आरोपी महंमद गौस नयाझी याचा अनेक वर्षांपासून शोध घेत आहेत; परंतु अजूनही त्याचा सुगावा लागलेला नाही.

प्रा. वेलिंगकर यांच्या मातृभाषा आंदोलनावरील ‘लोटांगण’ पुस्तकाचे उद्या प्रकाशन

हितचिंतकानी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून गोव्यातील एका ज्वलंत चळवळीवर प्रकाशझोत टाकणार्‍या ‘लोटांगण’च्या विमोचन कार्यक्रमास प्रतिसाद द्यावा, असे आवाहन प्रकाशक श्रीविद्या प्रतिष्ठान आणि लेखक प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी केले आहे.