Loksabha Elections 2024 : धर्माच्या आधारे मते मागण्याच्या आरोपावरून भाजपचे तेजस्वी सूर्या यांच्यावर गुन्हा नोंद !

बेंगळुरू दक्षिण मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार आणि प्रखर हिंदुत्वनिष्ठ तेजस्वी सूर्या

बेंगळुरू (कर्नाटक) : बेंगळुरू दक्षिण मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार आणि प्रखर हिंदुत्वनिष्ठ तेजस्वी सूर्या यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ‘त्यांनी धर्माच्या आधारे मते मागितली’, असा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे.

(सौजन्य : HW News English)

निवडणूक आयोगाच्या कर्नाटक राज्याच्या अध्यक्षांनी यासंदर्भात ‘एक्स’वरून पोस्ट करत म्हटले की, सूर्या यांनी सामाजिक माध्यमांवरून एक व्हिडिओ प्रसारित करून धर्माच्या आधारावर मते मागण्याचा प्रयत्न केला आहे. जयनगर पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

काँग्रेस ३० हून अधिक जागाही जिंकणार नाही !

२६ मे या दिवशी बेंगळुरू येथे मतदान झाले. लोकसभा निवडणुकीतील या दुसर्‍या टप्प्याच्या मतदानानंतर सूर्या म्हणाले की, काँग्रेस यंदा ३० जागांपेक्षा अधिक जागा जिंकू शकणार नाही. काँग्रेस पक्ष अत्यंत निराश झाला आहे. ते पंतप्रधानांवर जेवढी वैयक्तिक टीका करतील, तेवढे पंतप्रधान आणि भाजप अधिक भक्कम होईल, हे इतिहासाने दाखवून दिले आहे.