गोमंतकात जिहादचा वाढता धोका आणि त्यासाठी करावयाचे उपाय !

‘हिंदू रक्षा महाआघाडी’च्या वतीने ‘गोमंतकातील राष्ट्रीय घडामोडी आणि त्यासाठी करावयाचे उपाय’, या विषयावर नुकतेच पणजी येथील मिनेझिस ब्रागांझा सभागृहात प्रा. सुभाष वेलिंगकर यांचे व्याख्यान झाले. या व्याख्यानात गोव्यातील वेगवेगळ्या घडामोडी सांगून प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी ‘गोव्याला जिहादी आतंकवादापासून कसा धोका आहे ?’, हे उघड केले. या भाषणात त्यांनी मांडलेली महत्त्वाची सूत्रे येथे देत आहोत.

१. सध्या बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणार्‍या अनन्वित अत्याचाराचे ‘व्हिडिओ’ येत आहेत. त्यावरून लक्षात येते की, येणार्‍या काळात गोव्यातसुद्धा अशा घटना घडू शकतात. याचे कारण गोव्यात वाढत जाणारी बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोर अन् मुसलमान यांची संख्या होय !

२. गोव्यात सध्या तरी ५० सहस्र घुसखोर (रोहिंग्या आणि बांगलादेशी मुसलमान) अवैधपणे वावरत आहेत. आज वाळपई, मोतीडोंगर (मडगाव), डिचोली, चिंबल हे हिंदूबहूल मतदारसंघ हळूहळू मुसलमानांच्या कह्यात जात आहेत. ‘हिंदु उमेदवार त्या क्षेत्रात जर निवडून यायचा असेल, तर मुसलमानांची मते मिळाली, तरच तो निवडून येणार’, अशी परिस्थिती निर्माण करून ठेवण्यात आली आहे.

प्रा. सुभाष वेलिंगकर

३. तत्कालीन काँग्रेस नेते अन् पंतप्रधान राजीव गांधी यांनी त्यांच्या कारकीर्दीत देशभरात मुसलमान अनुयायांना सवलती देण्यासाठी ‘मुसलमान क्षेत्रे’ घोषित केली होती. त्या वेळी गोव्यात केवळ ७.५ टक्के मुसलमान असूनसुद्धा गोवा हे ‘मुसलमान क्षेत्र’ म्हणून त्यांनी घोषित केले होते. वर्ष २००१ मध्ये असलेली लोकसंख्या २०११ मध्ये दीड पटींनी वाढली. वर्ष २०२७ पर्यंत ती ११ टक्क्यांपर्यंत जाणार आहे.

४. आतापर्यंत गोव्यात ५७ छोटी पाकिस्ताने निर्माण झाली आहेत. गोव्यातील अनेक गावांत हे लोक विखुरलेले आहेत. पेडणे, मोरजी, कोरगाव या ठिकाणी पूर्वी एकही मुसलमान दिसत नव्हता, तिथे आज त्यांची दुकाने निर्माण व्हायला लागली आहेत. त्यांनी भूमी विकत घेतल्या आहेत. मजारी, दर्गे व्हायला लागले आहेत. घुसखोरांना मतपेढीच्या नावाखाली आधारकार्ड, रेशन कार्ड (शिधापत्रक), हे कोणतेही कष्ट न घेता दिली जातात. हे सर्व चित्र पहाता आजपर्यंत देशातील ९ राज्यांत (काश्मीर, लडाख, पंजाब, अरुणाचल प्रदेश, मिझोराम, नागालँड, मेघालय, मणीपूर आणि लक्षद्वीप) जसे हिंदू अल्पसंख्यांक झाले आहेत, त्याप्रमाणे येणार्‍या काळात गोवा हे १० वे राज्य होऊ शकते.

५. नाणूस (वाळपई), चिंबल, बेती, पर्वरी, फातोर्डा, अस्नोडा, थिवी आदी ठिकाणी इस्लामी नामकरण करण्याचे षड्यंत्र चालू झाले आहे. इस्लामपूर, लाला की बस्ती, हालीवाडा, नामनगर, पैठण, पीरवाडा, हसनवाडी अशा नावाने गावांची ओळख होऊ लागली आहे.

६. वाळपई, फातोर्डा, मोतीडोंगर हे टिकटिकणारे टाइम बाँब आहेत. मोतीडोंगर येथे यापूर्वी एक ट्रक भरून तलवारी आणण्यात आल्या होत्या.

७. गोव्यात अनेक आंतरराष्ट्रीय गुन्हेगार वास्तव्य करून गेले आहेत. ‘लष्कर ए तोयबा’चा म्होरक्या डेव्हिड कॉलमन हेडली, दाऊद सय्यद इराणी, ‘इंडियन मुजाहिदीन’चा सय्यद महंमद उपाख्य यासिन भटकळ, ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’चा अनिस अहमद, न्यूझीलंडमधील मशिदीमध्ये बाँबस्फोट घडवून आणणारा आतंकवादी बेंटन टेरांत, हे सर्व आतंकवादी गोव्यात वास्तव्य करून गेले आहेत. कुख्यात अतिरेकी बाटलू हा गोव्यातील मशिदीमध्ये लपून बसला होता. मुंबईमधील वर्ष १९९३ मधील बाँबस्फोटामध्ये वापरण्यात आलेले ‘आर्.डी.एक्स.’ स्फोटक गोव्यात मुरगाव तालुक्यातील चिखली येथील घरात १ रात्र आणि १ दिवस ठेवण्यात आले होते. वास्को येथे सेंट अँड्र्यू चर्चमध्ये दिनदार अंजुमन नामक आतंकवाद्याने बाँबस्फोट घडवून आणला होता. या सर्व गोष्टींचा अर्थ आतंकवाद्यांना साहाय्य करणारी यंत्रणा गोव्यात अस्तित्वात आहे.

८. ‘सर तन से जुदा’ (शिरच्छेद), ‘पाकिस्तान झिंदाबाद’, या घोषणा गोव्यातील मुसलमानांच्या मिरवणुकांमधून दिल्या जातात. पाकिस्तानी हिरवा ध्वज फडकावला जातो. श्रीराममंदिर उभारणीच्या विरोधात, बाबरी ढाचाच्या स्मृती जाग्या करण्यासाठी भित्तीपत्रके लावली जातात. ‘राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी प्रक्रिया (एन्.आर्.सी.)’, ‘नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए)’ यांच्या विरोधात सभा घेतल्या जातात. ‘हमास’ आतंकवादी संघटना आणि रोहिंग्या मुसलमान यांच्या समर्थनार्थ मोर्चे काढले जातात.

आतंकवाद पूर्णपणे निपटून काढण्यासाठी सरकारने कठोर पावले उचलायला हवीत. त्यासमवेत संपूर्ण हिंदू शक्ती एकसंघ होऊन तिने जागरण, आत्मसंरक्षण आणि संघर्षाची सिद्धता करण्याविना अन्य पर्याय नाही.’

– प्रा. सुभाष वेलिंगकर, ‘हिंदू रक्षा महाआघाडी’, गोवा.