प्रयागराज (उत्तरप्रदेश) – हिंदु समाज पक्षाचे नेते कमलेश तिवारी यांच्या हत्येच्या प्रकरणी सय्यद असीम अली या आरोपीला जामीन देण्यास अलाहाबाद उच्च न्यायालयाने नकार दिला.
उच्च न्यायालयाने म्हटले की, मृत (तिवारी) यांची निर्घृणपणे त्या करण्यात आली असून हे अत्यंत धार्मिक द्वेषाचे प्रकरण आहे. आरोपी गुन्ह्यात सहभागी होता आणि मोठ्या कटाचा भाग होता, हे दाखवण्यासाठी पुरेसे पुरावे आहेत. आरोपीने हत्येपूर्वी अनेक वेळा मुख्य आक्रमणकर्त्यांना दूरभाष केल्याचे पुरावे आहेत. या पार्श्वभूमीवर गुन्ह्याचे गांभीर्य आणि साक्षीदार प्रभावित होण्याची भीती लक्षात घेऊन जामीन नाकारण्यात येत आहे.