Murder Of  Satyanarayan Gurjar : धर्मांध मुसलमानांनी केलेल्या मारहाणीत रा.स्व. संघाच्या वृद्ध स्वयंसेवकाचा मृत्यू

  • (कोटा) राजस्थान येथील घटना !

  • मंदिरात जाण्यासाठी वाट देण्याची विनंती केल्यावरून झाली मारहाण  

  • फैझान, झीशान आणि फिरोज यांच्या विरोधात गुन्हा नोंद

मारेकरी फैझान व मृत्यू पावलेले सत्यनारायण गुर्जर

कोटा (राजस्थान) – येथे काही दिवसांपूर्वी देवनारायण मंदिरात जाणार्‍या ६५ वर्षीय वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला होता. हा मृत्यू आजारामुळे झाल्याचे म्हटले जात होते; मात्र आता मंदिराजवळील सीसीटीव्ही चित्रीकरणातून हा मृत्यू मारहाणीमुळे झाल्याचे उघड झाले. यानंतर पोलिसांनी फैझान, झीशान आणि फिरोज यांच्या विरोधात हत्येचा गुन्हा नोंदवला आहे. क्षुल्लक कारणावरून या तिघांनी सत्यनारायण गुर्जर यांना मारहाण केली होती. त्यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात भरती करण्यात आल्यावर उपचारांच्या वेळी त्यांचा मृत्यू झाला. गुर्जर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते. त्यांचा मुलगा युधिष्ठिर खताना हा भाजप युवा मोर्चा ग्रामीण भागातील जिल्हाध्यक्ष आहे.

२२ मे या दिवशी सत्यनारारण गुर्जर देवनारायण मंदिरात दर्शनासाठी गेले होते. मंदिराकडे जाणार्‍या मार्गावर बांधकाम काम चालू होते. तेथे बांधकामाचे साहित्य असल्याने त्यांना मंदिरात जात येत नव्हते. तेव्हा त्यांनी तेथे उपस्थितांना मंदिरात जाण्याचा मार्ग द्यावा, अशी विनंती केली. तथापि आरोपींनी गैरवर्तन करण्यास चालू केले आणि गुर्जर यांना मारहाण केली.

संपादकीय भूमिका

  • राजस्थानमध्ये भाजपचे सरकार असतांना अशी घटना घडू नये, असेच हिंदूंना वाटते !
  • ‘भारतात मुसलमान असुरक्षित आहेत’, असे म्हणणारे काँग्रेस, समाजवादी पक्ष, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, माकप आदी राजकीय पक्ष, तसेच पुरो(अधो)गामी आता तोंड का उघडत नाहीत ?