चंडीगड – पंजाबमधील लुधियाना येथे शिवसेना पंजाब’चे नेते संदीप थापर गोरा यांच्यावर ५ जुलै या दिवशी प्राणघातक आक्रमण झाले होते. हे प्रकरण शांत होत नाही, तोच पंजाबमध्ये आणखी एका हिंदु नेत्यावर आक्रमण झाले आहे. पंजाबमधील अमृतसरमध्ये १० जुलैला रात्री दुचाकीवरून आलेल्या ४ अज्ञात तरुणांनी राष्ट्रीय भगवा सेनेचे उपाध्यक्ष प्रवीण कुमार यांच्यावर गोळीबार केला. आक्रमणकर्त्यांनी गोळ्या झाडून प्रवीण कुमार यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. आक्रमणकर्त्यांनी ३ गोळ्या झाडल्या, त्यांपैकी एक प्रवीण कुमार यांच्या खांद्याला लागली. त्यात ते गंभीररित्या घायाळ झाले. घटनास्थळी लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्यात ही घटना चित्रित झाली आहे. प्रवीण कुमार यांना तातडीने गुरु नानक देव रुग्णालयात भरती असून तेथे त्यांच्यावर उपचार चालू आहेत.
Life-threatening attack on Rashtriya Bhagwa Sena’s Vice President Praveen Kumar in Punjab
Incidences of attacks on Hindu leaders in Punjab are increasing day by day.
Given this situation, will the Central Government intervene to ensure their safety?
While Hindus were under… pic.twitter.com/xJztO2YRIP
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 12, 2024
१. प्रवीण कुमार यांंच्या मालकीचे ई-रिक्षा शोरूम आहे. आक्रमण करणारे तरुण त्यांच्या शोरूममध्ये घुसले. २ तरुण शोरूममध्ये घुसले, तर इतर २ तरुण बाहेर उभे राहिले. आत आलेल्या तरुणांचे चेहरे कपड्याने झाकलेले होते. त्या तरुणांनी बंदुका काढून प्रवीण कुमार यांच्यावर गोळीबार केला.
२. गोळ्या झाडल्यानंतर आरोपींनी तात्काळ घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेची माहिती मिळताच मजिठा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.
३. पंजाबमधील लुधियाना येथे ‘शिवसेना पंजाब’चे नेते संदीप थापर गोरा यांच्यावर प्राणघातक आक्रमण करण्यात आले होते. त्यात ते गंभीररित्या घायाळ झाले आहेत. ते सातत्याने खलिस्तानविरोधी भूमिका घेत असल्यामुळे त्यांच्यावर आक्रमण झाले होते, असे बोलले जात आहे.
संपादकीय भूमिका
|