Pala Santosh Kumar : तमिळनाडू सरकारकडून हिंदुत्वनिष्ठ नेते पाला संतोष कुमार यांना अटक !

  • तमिळनाडूतील द्रमुक सरकारने २०० हिंदु मंदिरे पाडल्याची दिली होती  माहिती !

  • अब्रुनुकसानीचा आरोप करून राज्य सरकारकडून कारवाई !

हिंदुत्वनिष्ठ नेते पाला संतोष कुमार

चेन्नई (तमिळनाडू) – राज्यातील तांजावूर येथील ‘हिंदु येल्लुची पुरवाई’ या हिंदुत्वनिष्ठ संघटनेचे प्रमुख श्री. पाला संतोष कुमार यांना राज्य सरकारने अटक केल्याचे समजते. कुमार यांनी हिंदुत्वनिष्ठांना संबोधित करतांना तमिळनाडूतील द्रमुक सरकारने २०० हिंदु मंदिरे पाडल्याची माहिती दिली होती. यावरून सरकारने त्यांना अन्याय्य अटक केली.

सरकारची अब्रुनुकसानी केल्याचे कारण देण्यात त्यांच्याविरुद्ध ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आलेे. कुमार यांच्याविरुद्ध तसा गुन्हाही नोंदवण्यात आला आहे. त्यांना एका दिवसानंतर जामीन मिळाल्याचे वृत्त आहे. ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने पाला संतोष कुमार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.