वाहनचालक मनसूर अहमदला अटक
बेंगळुरू – हिंदु नेते पुनीत केरेहळ्ली आणि त्यांच्या सहकार्यांनी मद्दूर येथे बेंगळुरूच्या पशूवधगृहाकडे नेण्यात येणार्या ३०हून अधिक गायींची अवैध वाहतूक रोखून गायींची सुटका केली.
#Hindu leader Puneeth Kerehalli stops a truckload of #COWS from being transported #ILLEGALLY to a slaughterhouse !
The driver Mansoor Ahmed has been arrested pic.twitter.com/257ReKES7V
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) September 6, 2024
याविषयी मिळालेल्या माहितीनुसार, एका आयशर वाहनात अवैधरित्या ३०हून अधिक गायींची वाहतूक केली जात होती. याची माहिती मिळाल्यानंतर पुनीत केरेहळ्ली आणि त्यांच्या सहकार्यांनी मद्दूर येथे वाहन थांबवून पडताळणी केली. त्यानंतर पुनीत केरेहळ्ळी यांनी गायींच्या अवैध वाहतुकीविषयी मद्दूर पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट (दाखल) केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी वाहनचालक मनसूर अहमदला अटक केली.