चैतन्य म्हणजे नक्की काय ?

चैतन्य म्हणजे नक्की काय ? रज-तमाचे आवरणवाले सांगू शकणार नाहीत ।
कारण चैतन्य कशाशी खावे, त्यांना माहीत नसते ।
संत, महंत आणि गुरु हे सांगितल्यावाचून रहाणार नाहीत ॥

एकादशीचे व्रत कसे करावे ?

‘एकावर एक ११ म्हणजे एकादशी. याचा अर्थ एकत्व सोडू नये. या दिवशी लंघन करणे, उपवास करणे, याचा उद्देश आहे, लक्ष तिकडे न जाता भगवंताकडे रहावे; मात्र आता हा अर्थ गौण झाला आहे आणि उपवास प्रधान झाला आहे !

हिंदु धर्मात सांगितल्याप्रमाणे आचरण करणे, हा आजच्या परिस्थितीवरील रामबाण उपाय !

हिंदु धर्मामध्ये ‘धर्माचरण करून स्वतःची उन्नती व्हावी’, यादृष्टीने विचार केला जातो; म्हणून ‘सर्वेत्र सुखिनः सन्तु ।’, म्हणजे ‘सर्व सुखी होवोत’, असे म्हटले आहे.

शारीरिक त्रास होत असतांना परात्पर गुरु पांडे महाराज यांनी सांगितल्याप्रमाणे स्वतःच्या शरिरात असणार्‍या देवीतत्त्वाचे साहाय्य घेणे आणि देवीच्या चैतन्यामुळे आध्यात्मिक त्रास नष्ट होऊन ‘शरीर म्हणजे जणू देवीचे देऊळ आहे’, अशी अनुभूती येणे

एकदा मला पुष्कळ त्रास होत होता. त्या वेळी परात्पर गुरु पांडे महाराज यांनी मला सांगितले, ‘‘आपल्या शरिरात देवीतत्त्व आहे.