चैतन्य म्हणजे नक्की काय ? रज-तमाचे आवरणवाले सांगू शकणार नाहीत ।
कारण चैतन्य कशाशी खावे, त्यांना माहीत नसते ।
संत, महंत आणि गुरु हे सांगितल्यावाचून रहाणार नाहीत ॥ १ ॥
परात्पर गुरु (टीप १) चैतन्याचे महत्त्व शक्तीस्तवनात वर्णिती ।
आदि शक्ति तू, अंत शक्ति तू ।
चराचराचरातील शक्ति तूच तू ॥ २ ॥
संत ज्ञानेश्वर माऊली चैतन्यानेच ज्ञानेश्वरीचा श्रीगणेशा करती ।
ॐ नमोजी आद्या । वेद प्रतिपाद्या ।
जय जय स्वसंवेद्या । आत्मरूपा ॥ ३ ॥
परात्पर गुरु पांडे महाराज चैतन्याचा सतत महिमा गाती ।
चैतन्य…चैतन्य…चैतन्य असते ।
देऊळ नसते, देव नसतो, तेथेही चैतन्य असते ।
चंद्र, तारा, वारा, आकाश नसते, तरी तिथे चैतन्य असते ।
नदी, झरा, अथांग सागर नसते, तरी तिथेही चैतन्य असते ॥ ४ ॥
परात्पर गुरु पांडे महाराज चैतन्याचा मार्ग दाविती ।
चैतन्याने नटली सृष्टी, चैतन्यावर चालते जग ।
चैतन्यच होते, आहे आणि रहाणार ।
सत्य, शाश्वत आणि आनंद यांचे नाव चैतन्य ॥ ५ ॥
चैतन्यलाच पुढे आणा, त्याचाच जागर करा ।
चैतन्याने भारित व्हा ।
चैतन्यानेच मिळेल मोक्ष ।
चैतन्यानेच निर्माण होईल हिंदु राष्ट्र ॥ ६ ॥
इति गुह्यतमं शास्त्रम्, परात्पर गुरु पांडे महाराज उवाच ।
अर्थ : हे अत्यंत गहन शास्त्र परात्पर गुरु पांडे महाराज यांनी सांगितले. हे परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणकमलांवर अर्पण होवो !
टीप १ : परात्पर गुरु डॉ. आठवले
परात्पर गुरु डॉक्टरांच्या कमलचरणी अर्पणमस्तु ॥
– श्री. शिवाजी वटकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (७.६.२०१८)