हिंदु धर्मात सांगितल्याप्रमाणे आचरण करणे, हा आजच्या परिस्थितीवरील रामबाण उपाय !

(परात्पर गुरु) पांडे महाराज

१. हिंदु धर्माप्रमाणे धर्माचरण होत नसल्यामुळे समाजात वाईट विचारांचा प्रभाव वाढलेला असणे

हिंदु धर्मामध्ये ‘धर्माचरण करून स्वतःची उन्नती व्हावी’, यादृष्टीने विचार केला जातो; म्हणून ‘सर्वेत्र सुखिनः सन्तु ।’, म्हणजे ‘सर्व सुखी होवोत’, असे म्हटले आहे. इतर पंथियांमध्ये स्वतःच्या स्वार्थासाठी आणि तेही भौतिक सुख अधिकाधिक मिळवण्यासाठी, तसेच दुसर्‍यांचा नाश व्हावा, यासाठी प्रयत्न करण्यास सांगितले जाते. त्यामुळे अगोदरच असलेल्या रज-तमामध्ये या विचारांची भर पडून वातावरणात रज-तम विचारांचा प्रभाव वाढला आहे. हिंदु धर्माप्रमाणे धर्माचरण होत नसल्यामुळे समाजात वाईट विचारांचा प्रभाव वाढला आहे. यामुळे अन्य धर्मीय हे हिंदु धर्मियांना फसवून त्यांचे धर्मांतर करत आहेत. हिंदु धर्माव्यतिरिक्तच्या विचारांमुळे भगवंताने दिलेल्या उपलब्धतेचा लाभ करून घेऊन आपण आनंद उपभोगू शकत नाही. भगवंताने दिलेल्या बुद्धीचा उपयोग न करता स्वतः दुःखात राहून दुसर्‍यालाही आनंदापासून वंचित ठेवतो.

२. धर्माचरण न केल्याने विवेकबुद्धी नष्ट होणे, त्यामुळे योग्य विचार न सुचणे आणि त्या व्यक्तीचा विनाश, म्हणजे अधःपात होणे

गीते (२ – ६२) मध्ये सांगितले आहे, ‘कोणत्याही प्रसंगाला तोंड देतांना अविवेक ठेवून कार्य केल्याने त्याचा स्वार्थ साध्य होत नाही. त्यामुळे तो मनुष्य क्रोधायमान होतो. अशा क्रोधामुळे त्याच्यात अविचार उत्पन्न होतो. अविचाराने त्याची स्मरणशक्ती भ्रष्ट होते आणि त्याच्या बुद्धीचा, म्हणजे ज्ञानाचा नाश होतो. त्याला योग्य विचार सुचत नाहीत. त्यामुळे त्याचा विनाश म्हणजे अधःपात होतो.’ त्यामुळे रागाने आक्रमण करून येणार्‍या विनाशाची समस्या सुटणार नाही. हे टाळण्यासाठी सर्वांनी धर्माचरण करून हिंदु राष्ट्र स्थापण्यासाठी प्रयत्नरत व्हायला हवे. यासाठी सर्वांनी मिळून योग्य विचारांती कार्य केल्यास पुढे त्याचे दुष्परिणाम होणार नाहीत. धर्माच्या नियमाप्रमाणे वागणे, म्हणजेच हिंदु राष्ट्राची निर्मिती होण्यासाठी सर्वांनी सहभागी होणे, ही काळाची निकड झाली आहे.’

– (परात्पर गुरु) पांडे महाराज (६.१२.२०१५)