शारीरिक त्रास होत असतांना परात्पर गुरु पांडे महाराज यांनी सांगितल्याप्रमाणे स्वतःच्या शरिरात असणार्‍या देवीतत्त्वाचे साहाय्य घेणे आणि देवीच्या चैतन्यामुळे आध्यात्मिक त्रास नष्ट होऊन ‘शरीर म्हणजे जणू देवीचे देऊळ आहे’, अशी अनुभूती येणे

‘एकदा मला पुष्कळ त्रास होत होता. त्या वेळी परात्पर गुरु पांडे महाराज यांनी मला सांगितले, ‘‘आपल्या शरिरात देवीतत्त्व आहे. या देवींचे आपण साहाय्य घ्यायला हवे. देवींना साहाय्य मागितलेले पुष्कळ आवडते आणि त्या आपल्यावर कृपा करून साहाय्य करतात. त्यांना साहाय्य मागितले की, त्यांचे चैतन्य जागृत होऊन आपल्याला त्याचा लाभ होतो आणि आपला त्रास न्यून होतो.’’ त्यांनी मला शक्तीस्तवन म्हणायला सांगितले. तसे केल्यावर मला माझे शरीर म्हणजे सर्व देवींचे देऊळ असल्याप्रमाणे शरिरात ठिकठिकाणी देवींचे दर्शन घडले.’ आपल्या शरिरात हृदय, डोळे, कान, नाक आदी अवयव असतात. त्या ठिकाणी मला अनेक देवींचे दर्शन झाले. देवींचे साहाय्य मागितल्यावर तिचे चैतन्य जागृत होऊन माझा त्रास नष्ट झाला आणि ‘माझे शरीर हे देवीचे देऊळ आहे’, अशी अनुभूती मला आली.’

– कु़. दीपाली गोवेकर, फोंडा,गोवा. (मे २०१९)

या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक