संघाच्या शाखांमध्ये महिलांना प्रवेश देण्याविषयी होऊ शकतो निर्णय !

संघाकडून दुर्गावाहिनीसारखी संघटना महिलांसाठी कार्यरत आहे. त्यामुळे आता थेट संघाच्या शाखेत महिलांना प्रवेश देण्यावर निर्णय घेतला जाऊ शकतो.

ब्रिटीश राजवटीपूर्वी भारतात ७० टक्के लोकसंख्या शिक्षित होती ! – सरसंघचालक !

भारताची शिक्षणव्यवस्था केवळ रोजगारासाठी नव्हे, तर ज्ञानाचेही माध्यम होती. सर्वांना स्वस्त दरात शिक्षण उपलब्ध होते. शिक्षणाचा सर्व खर्च समाजाने उचलला होता. यातून अनेक कलाकार, विद्वान मंडळी जगभर ओळखली गेली..

जमियतचे नेते मौलाना मदनी यांचा ‘अल्ला आणि ॐ एकच’ असल्याचा दावा !

जैन मुनी लोकेश यांनी त्यांच्या विधानावर तीव्र आक्षेप घेतला. ‘हे अधिवेशन माणसे जोडण्यासाठी आयोजित केले आहे. त्यामुळे अशा विधानाचे कोणतेही औचित्य नाही’, असे सांगत संतांनी मंच सोडला.

मी ‘ब्राह्मण’ नव्हे, तर ‘पंडित’ असा शब्द उच्चारला ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

मी ‘ब्राह्मण’ शब्द उच्चारला नाही. मी ‘पंडित’ असा शब्द उच्चारला. जो बुद्धीमान असतो, त्याला ‘पंडित’ म्हणतात, असा खुलासा प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी ब्राह्मणांविषयी केलेल्या वक्तव्यावर केला.

जाती ईश्‍वराने नव्हे, तर ब्राह्मणांनी निर्माण केल्या ! – डॉ. मोहन भागवत, सरसंघचालक

हिंदु समाज देशातून नष्ट होण्याची भीती वाटत आहे का ? मात्र हे तुम्हाला कोणताच ब्राह्मण सांगू शकणार नाही. ते तुम्हाला समजून घ्यावे लागेल.

भारत देश महान झाला पाहिजे, हे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे स्वप्न पूर्ण करणे आपले दायित्व ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

भारत हा महान देश व्हावा, हे स्वप्न नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी पाहिले होते. ते आजही अपूर्ण राहिले आहे. ते पूर्ण करण्याचे दायित्व आपले आहे.

१ सहस्र वर्षांपासून युद्ध लढणारे हिंदू आक्रमक होणे नैसर्गिक ! – सरसंघचालक

मुसलमानांनी ‘आपण उच्च कुळातील आहोत, आपण पूर्वी या देशावर राज्य केले आहे आणि पुन्हा करू शकतो, केवळ आपला मार्ग योग्य आहे, इतर चुकीचे आहेत, हे ग्रह त्यांनी (मुसलमानांनी) बाजूला ठेवले पाहिजेत.

सुखाची विचारधारा जगाची एक आणि भारताची वेगळी आहे ! – प.पू. सरसंघचालक मोहन भागवत

सरस्‍वतीदेवी आहे कि नाही ? हा प्रश्‍न सध्‍या उपस्‍थित केला जातो; पण जग विश्‍वासावर चालते. मनुष्‍य हा एकमेव प्राणी असा आहे की, जो स्‍वतः विश्‍वास ठेवतो आणि दुसर्‍यांना विश्‍वास ठेवायला लावतो. श्रद्धा ठेवतोही आणि ती ठेवायलाही लावू शकतो.

भारताला विश्वगुरुपदी नेण्यासाठी बलसंपन्न समाजाची निर्मिती आवश्यक ! – सरसंघचालक

भारताला ओळखा, भारताला जाणा आणि भारतीय व्हा. भारत हे हिंदु राष्ट्र आहे. सर्व भाषा, सर्व पंथ, उपपंथ सर्वांचा सन्मान करा. सर्वांप्रती सद्भावना ठेवा. रा.स्व. संघाचे कार्य दुरून न पहाता संघाच्या कार्यात सहभागी व्हा आणि संघाचे कार्य जवळून जाणून घ्या.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आजपासून नागेशी (गोवा) येथे अखिल भारतीय स्तरावरची ‘समन्वय बैठक’

नागेशी, फोंडा येथे प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांची संघाचे काही प्रमुख अखिल भारतीय पदाधिकारी आणि निवडक संघ प्रेरित विविध संघटनांचे पदाधिकारी यांची अखिल भारतीय स्तरावरची ‘समन्वय बैठक’ होणार आहे.