रा.स्व.संघाचे सरसंघचालक प.पू. मोहनजी भागवत यांचा स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने उद्घोष !
बेंगळुरू (कर्नाटक) – भारताला त्याच्या क्षमता वाढवण्याची आवश्यकता आहे. आपली सांस्कृतिक शक्ती आणि क्षमता यांच्या बळावर भारत जगासाठी आशेचा किरण बनू शकतो, असे वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक प.पू. मोहनजी भागवत यांनी केले. ते येथे ‘समर्थ भारत संस्थे’च्या वतीने आयोजित ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
भारत जगाला जागृत करण्यास सक्षम : डॉ. मोहनजी भागवत: #MahaMTB @DrMohanBhagwat @RSSorg https://t.co/F7ZSMnEzRc
— महा MTB (@TheMahaMTB) August 15, 2023
प.पू. मोहनजी भागवत पुढे म्हणाले की,
१. जगाला जागरूक करण्याची क्षमता भारतामध्ये आहे; परंतु काही शक्ती आपली प्रगती रोखण्यासाठी कार्यरत आहेत. त्यांच्यापासून आपल्याला सतर्क रहावे लागेल.
२. भारत जगाला ज्ञान, शुद्धता, समृद्धी आणि समर्पण शिकवण्यास सक्षम आहे. आपण सूर्याची पूजा करत असल्याने आपल्या देशाला ‘भारत’ या नावाने संबोधले जाते.