वेदरक्षणाच्या परंपरेच्या विस्ताराची आवश्यकता ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

डावीकडून प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत आणि कामकोटी पीठाचे शंकराचार्य विजयेंद्र सरस्वती

वाराणसी (उत्तरप्रदेश) – येणारा काळ हा भारत आणि सनातन धर्म यांचा आहे. वेद म्हणजे ज्ञानाचे भंडार आहे. वेदांमध्ये सर्व काही आहे. सातत्याने होणार्‍या आक्रमणांमुळे सर्वत्र, विशेषतः उत्तर भारतात वेदिक ज्ञानाची मोठी हानी झाली. अग्निहोत्राच्या अनुयायांनी युगानुयुगे या ज्ञानाचे रक्षण केले आहे. या परंपरेचा विस्तार करण्याची आवश्यकता आहे, असे विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प.पू.सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी येथे एका कार्यक्रमात केले.

ही सनातन धर्माच्या उत्थानाची वेळ !

सरसंघचालक पुढे म्हणाले, ‘‘ही वेळ सनातन धर्माच्या उत्थानाची आहे. भारत संपूर्ण जगाला धर्माचे ज्ञान देईल. धर्माचे मूळ सत्य आहे. आज संपूर्ण विश्‍व वेदांविषयी विचार करत आहे. आपल्याला वेदांविषयी माहिती आहे; परंतु पूर्ण माहिती नाही.’’

सरसंघचालकांनी घेतली कांची कामकोटी पीठाच्या शंकराचार्यांची भेट !

या प्रसंगी सरसंघचालकांनी येथील गंगा तटावरील सिंह किला येथे चातुर्मासाचे व्रत करणारे कामकोटी पीठाचे शंकराचार्य विजयेंद्र सरस्वती यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले.