हिंदूंचा आत्मसन्मान वाढवणारा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल !

‘महाराष्ट्र विधानसभेचे नुकतेच निकाल घोषित झाले. या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्र्रवादी काँग्रेस पक्ष मिळून २३० आमदार निवडून आले अन् महाराष्ट्रातील १२ कोटी जनतेने हिंदुत्वनिष्ठ महायुतीला एक अभूतपूर्व यश दिले.

विधानसभा निवडणुकीतील निकालाच्या विरोधात न्यायालयात याचिका प्रविष्ट करणार ! – विक्रम सावंत, माजी आमदार

विक्रमसिंह सावंत म्हणाले की, महायुतीच्या उमेदवारांना लाखांहून अधिक मते, तर ३६ सहस्रांहून अधिक मताधिक्य मिळाले आहे. जत शहरासह तालुक्यातील ६७ गावांत मताधिक्य १०० टक्के मिळणे अपेक्षित असतांना अवघ्या ६ गावांत किरकोळ मताधिक्य मिळाले आहे.

संपादकीय : हिंदुहिताच्या राजकारणाची नांदी !

हिंदुत्वाविषयी हिंदू सजग आणि जागरूक होत असल्याचे हे लक्षण आहे. त्यामुळे येणार्‍या काळात  राजकारणाचा पाया ‘हिंदुत्व’ हाच ठेवणे, हे महायुतीसाठी आणि हिंदूंसाठीही हिताचे आहे.

जय जय महाराष्ट्र माझा…!

वर्ष २०१५ मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, तेव्हा महाराष्ट्रात जातीयवादालाच प्रमुख ‘स्ट्रॅटेजी’ (धोरण) ठरवून राजकारण करण्याचा प्रयोग चालू झाला होता. वर्ष २०१९ च्या निवडणुकीत जनतेने दिलेला स्पष्ट कौल नाकारून भाजपच्या पाठीत खंजीर खुपसून….

महाराष्ट्रातील विधानसभेचा निकाल म्हणजे सावरकरी हिंदुत्वाचा विजय ! – श्याम देशपांडे, जिल्हाध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर सामाजिक सेवा समिती 

महाराष्ट्रातील विधानसभेचा निकाल पहाता धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली केवळ तुष्टीकरणाचा खेळ खेळत हिंदूंच्या भावना आणि त्यांची जीवनमूल्ये यांची चेष्टा करणार्‍या तथाकथित राजकारण्यांना संपूर्ण समाजाने दिलेला धडा हा सावरकरी हिंदुत्वाचा विजय आहे…

पंढरपूर येथील निकालाच्या विरोधात मनसे याचिका प्रविष्ट करणार !

दिलीप धोत्रे म्हणाले, ‘‘रेल्वे इंजिन’ला मतदान केल्याचे मतदार सांगत होता; पण निकाल धक्कादायक होता. याचा अर्थ ‘ई.व्ही.एम्.’ घोटाळा झाला आहे. त्यामुळे यंत्राच्या विरोधात मी उच्च न्यायालयात दाद मागणार आहे.’’

संपादकीय : झारखंडमध्ये ‘हिंदू कटेंगे’ ?

झारखंडमधील हिंदूंच्या रक्षणाचे दायित्व केंद्र सरकार आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी आता पार पाडणे आवश्यक आहे !

‘इ.व्ही.एम्.’ विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार ! – डॉ. हुलगेश चलवादी, बहुजन समाज पक्षाचे उमेदवार

५० सहस्रांहून अधिकची हक्काची मते असूनही तेवढीही मते न मिळाल्याने इ.व्ही.एम्. यंत्रणेत घोळ असल्याचा आरोप वडगाव शेरी मतदारसंघातील बहुजन समाज पक्षाचे उमेदवार आणि प्रदेश महासचिव, पश्चिम महाराष्ट्र प्रभारी डॉ. हुलगेश चलवादी यांनी केला.

६० टक्क्यांहून अधिक मुसलमान मतदार असलेल्या मतदारसंघात ‘कमळ’ फुलले !

भाजपचे उमेदवार ठाकूर रामवीर सिंह गेली ८ वर्षे जनतेला सर्वप्रकारे करत आहेत साहाय्य !

महाराष्ट्रात ‘नोटा’ला नकार, महायुतीला बहुमत देण्याकडे जनतेचा कल !

वर्ष २०१९ च्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत ७ लाख ४२ सहस्र १३४ मतदारांनी नोटा पर्यायाचा वापर केला होता. वर्ष २०२४ च्या निवडणुकीत एकूण मतदानामध्ये ४.९५ टक्के इतकी वाढ होऊनही नोटाचा पर्याय वापरणार्‍या मतदारांच्या संख्येत मात्र घट झाली.