केवळ दोन मंतरलेली वाक्ये एकाने विजयाचा आरंभ आणि दुसर्याने पराजयाचा अंत. या दोन वाक्यांमध्ये दडली आहे, ‘महाराष्ट्राच्या हिंदुत्वाची विजयगाथा.’ पहिले वाक्य एका योगी पुरुषाने उच्चारले ‘बटेंगे तो कटेंगे’ (विभागले गेलो, तर कापले जाऊ) आणि हिंदूसिंह दचकून जागा झाला. त्याने डोळे किलकिले करून बघितले, तर ‘रामप्रहर’ (सूर्योदयाच्या आधीचे ३ घंटे) झाल्याचे त्याच्या लक्षात आले. तेवढ्यात दुसरे श्री जगदंबेच्या एका अनन्य भक्ताचे ‘एक हैं तो सेफ हैं’ (संघटित असलो, तर सुरक्षित राहू), हे वाक्य त्याच्या कानावर पडले आणि तो ताडकन उठला. दोन पावले पुढे टाकली, तेव्हा त्याला कोल्हेकुई आणि भुंकण्याचा कलकलाट ऐकू आला. त्याने एकदा मागे वळून पाहिले. गत इतिहासाचे अवलोकन (यालाच ‘सिंहावलोकन’ म्हणतात.) केले आणि दबक्या पावलांनी तो त्या कोल्ह्या-कुत्र्यांची शिकार करण्यासाठी निघाला.
त्याच्या शिकारीच्या त्या शुभसंकल्पाला भगवंतानेही ‘तथास्तु’ म्हणून आशीर्वाद दिला; म्हणून तर कार्तिक कृष्ण अष्टमी, म्हणजेच २० नोव्हेंबर २०२४ या दिवशी काळावर सत्ता असलेल्या श्री काळभैरवाच्या जयंतीच्या दिवशी धर्मरक्षणासाठी भगवंताने काळानुरूप हिंदूसिंहाच्या संकल्पसिद्धीसाठी हा शुभमुहूर्त निश्चित केला आणि त्या शुभमुहूर्ताची वाट बघत सिंहही दबा धरून बसला. हिंदुत्वाच्या विरोधात भुंकणार्या कुत्र्यांवर आणि त्यांच्या रक्षणासाठी कोल्हेकुई करणार्या कोल्ह्यांवर त्याने त्या शुभमुहूर्तावर अशी झडप घातली की, त्या कोल्ह्या-कुत्र्यांना काय झाले, हे कळण्याच्या आतच हिंदुसिंहाने त्यांचा निकाल लावला आणि सिंहगर्जना केली. हातात विजयमाळ घेऊन उभ्या असलेल्या विजयश्रीने धावत येऊन त्याच्या गळ्यात ती विजयमाळ घातली. अशा प्रकारे काळानुकूल धर्मसंस्थापनेची देवता भगवान श्रीकृष्ण, साधू-संत, भक्त आणि योगी यांच्या आशीर्वादाने विजयश्री हिंदुत्वाची सहधर्मिनी झाली.

वर्ष १९७८ पासून हिंदुत्वाची स्थिती आणि यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून हिंदूंनी धर्मद्रोह्यांना दिलेली चेतावणी
तसे पाहिले, तर स्वातंत्र्यापासूनच आणि महाराष्ट्रापुरते बोलायचे झाले, तर वर्ष १९७८ पासून विजयश्री व्यथित होऊन या कोल्ह्या-कुत्र्यांचा संसार चालवत होती. मध्ये २-३ वेळा तिला हिंदुत्वाशी संसार थाटण्याचे भाग्य लाभले होते; परंतु तो कालावधी अत्यल्प असल्याने तिचा संसार खर्या अर्थाने फुलला नव्हता. वर्ष २०१४ आणि २०१९ ही १० वर्षे ती देशपातळीवर सुखाने संसार करत होती; मात्र महाराष्ट्रात वर्ष २०१४ मध्ये थाटलेला सुखाचा संसार कोल्ही-कुत्री केव्हाही विस्कटून टाकतील, या भयातच गेली होती. वर्ष २०१९ मध्ये देशपातळीसह तिने महाराष्ट्रातही पुन्हा हिंदुत्वाला वरले; पण या वेळी कोल्ह्या-कुत्र्यांनी डाव साधला. विश्वासघाताने तिला पळवून नेले आणि तिची विटंबना केली. या वेळी मात्र तिला भगवान श्रीकृष्णाचे आणि साधू-संतांचे आशीर्वाद लाभल्याने तिने अत्यंत आनंदाने अन् निर्भयतेने धावत जाऊन हिंदुत्वाला वरले आणि हिंदु राष्ट्राची ‘प्रभात’ झाली. अवघ्या ४-५ महिन्यांपूर्वी देशपातळीवर स्वतःकडून झालेल्या भयंकर चुकीची जाणीव हिंदुसिंहाला झाली. त्या वेळी भगवंताच्या कृपेने जिवावरचा आघात शेपटावर निभावल्याचे त्याच्या लक्षात आले; म्हणून या वेळी त्याने या कोल्ह्या-कुत्र्यांची इतकी दुर्दशा केली आहे की, सगळ्यांचे ‘हात’, हातातील ‘मशाल’ आणि हातात धरलेल्या ‘तुतारी’सह एक एक पायही तोडला. त्यांना लुळे-पांगळे करून चेतावणी दिली, ‘सावधान ! जर पुन्हा माझ्या वाटेत आडवे याल, तर तुमचे अस्तित्वही उरणार नाही.’
महाराष्ट्राच्या हिंदुत्वाची जागतिक पातळीवर पोचलेली विजयगाथा !
अशा प्रकारे हिंदुसिंहाने त्याच्या पराजयाचा सदासाठी अंतही केला आहे. तो आता ‘बटेंगे तो कटेंगे’, हे पक्के लक्षात ठेवून आणि ‘एक हैं तो सेफ हैं’, या घोषवाक्यातून प्रेरणा घेऊन लवकरच, म्हणजे वर्ष २०२५ मध्ये हिंदु राष्ट्राच्या उगवणार्या ‘सनातन धर्मसूर्या’च्या स्वागताची सिद्धता करत आहे. त्यामुळे पुढील सहस्र वर्षे तरी या वसुंधरेवर विजयश्री आणि हिंदुत्वाचा हा संसार आनंदाने फुलणार, फळणार आहे. अशा प्रकारे या दोन वाक्यांमध्ये घडलेली ही केवळ महाराष्ट्राच्या हिंद़ुत्वाची नव्हे, तर जागतिक पातळीवर पोचलेल्या अभूतपूर्व विजयगाथेची ही साठा उत्तराची रम्य कथा पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण झाली.
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
– श्रीमती कमलिनी कुंडले, सनातन आश्रम, मिरज.