Delhi CM Resigns : आतिशी यांनी दिले मुख्यमंत्रीपदाचे त्यागपत्र

उपराज्यपालांनी विधानसभा केली विसर्जित

आम आदमी पक्षाच्या सरकारच्या मुख्यमंत्री आतिशी आणि  उपराज्यपाल व्ही.के. सक्सेना

नवी देहली : देहलीच्या आम आदमी पक्षाच्या सरकारच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी त्यांच्या पदाचे त्यागपत्र दिले. त्यांनी उपराज्यपाल व्ही.के. सक्सेना यांना त्यागपत्र सादर केले. त्यानंतर उपराज्यपालांनी देहली विधानसभा विसर्जित करण्याची अधिसूचना जारी केली.

देहलीच्या पुढील मुख्यमंत्र्यांचे नाव अंतिम करण्यासाठी भाजपकडून केंद्रीय गृहमंत्री  अमित शहा यांच्या घरी बैठक घेण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका आणि फ्रान्स या देशांच्या दौर्‍यावर जात आहेत. त्यामुळे देहलीच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा ते परतल्यानंतरच होईल, असे म्हटले जात आहे.